अजय कंडेवार,वणी :- गेल्या काही वर्षांपासून वेकोलिच्या भूमिपुत्रांवर अन्याय होत आहे. कारण जेव्हा वेकोली मुख्यालयातून भूमिपुत्र आश्रितांना रोजगाराचे आदेश दिले जातात तेव्हा ते ज्या (क्षेत्रातून)भागातून आले आहेत. त्या भागाला रोजगाराचे आदेश देण्याऐवजी अन्य दुसऱ्या ठिकाणी नोकरीचे आदेश मिळवून देतात त्याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कामगार सेल महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आबिद हुसैन व यवतमाळ सामजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष विजय नगराळे यांच्या नेतृत्वात वणी कार्याध्यक्ष खुशाल बासमवार व अन्य पदाधिकाऱ्यांनी वर्धा लोकसभा क्षेत्र खासदार अमर काळे यांना भेट देत शेतकरी भूमिपुत्रांना न्याय मिळवून द्यावा याबाबत निवेदनातून मागणी करण्यात आली.
ज्यांच्या शेतजमिनी वेकोलिच्या ताब्यात आहेत त्यांना भरपाई व रोजगार दिला जातो, मात्र गेल्या काही वर्षांपासून वेकोलिच्या भूमिपुत्रांवर अन्याय होत आहे.(उदा. वणी तालुका यवतमाळ जिल्ह्याने वणी उत्तर (नॉर्थ) भागात येणाऱ्या कोळसा खाणीत रोजगार उपलब्ध करून द्यावा) पण वेकोलि. जेव्हा मुख्यालयातून आश्रितांना रोजगाराचे आदेश दिले जातात तेव्हा ते ज्या भागातून आले आहेत. त्या भागात रोजगाराचे आदेश देण्याऐवजी नागपूर, मध्य प्रदेश, पेच क्षेत्र, कन्हान क्षेत्र, पॉवरसीडा, उमरेड क्षेत्र, नागपूर क्षेत्र इ. . दिल्या जाते याचाच अर्थ स्पष्ट की जमीन एका ठिकाणीची आणि नौकरी एका ठिकाणीं…हा भूमिपुत्रांवर अन्यायच आहे.गेल्या पाच वर्षापूर्वी हा भोंगळ कारभार वेकोलीत सुरू आहे. वेकोलीने असा कोणताही कायदा केलेला नाही की, जमीन संपादित करताना, ज्या क्षेत्रात जमीन संपादित केली आहे, त्याच क्षेत्रात रोजगार देण्याऐवजी अन्य कोणत्यातरी क्षेत्रात रोजगार दिला जाईल, असे लेखी लिहिलेले नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबाला आणि तिथे राहणाऱ्या लोकांची अडचण होत आहे. विशेषतः वेकोली मुख्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्याशी अर्थपूर्ण व्यवहार करून ज्या भागात त्यांची जमीन आहे, त्या ठिकाणी वापस नोकरीचे आदेश मिळवून देतात.
त्यामुळें या संदर्भात आपण जातीने लक्ष घालून वेकोली मुख्यालयात भूमिपुत्राशी होणारा अन्याय थांबावावा ज्या भागात शेती गेल्या आहेत त्याच ठिकाणीं रोजगार उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून आपल्यामार्फत त्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा पदाधिकाऱ्यांतर्फे करण्यात आली. यावेळी यावेळी निवेदन सादर करतान प्रदेश कामगार उपाध्यक्ष अबिद हुसेन, सामाजिक न्याय विभाग यवतमाळ जिल्हाध्यक्ष विजय नगराळे, तालुका कार्याध्यक्ष खुशाल बासमवार,तालुका अध्यक्ष सा.न्या. वि,अनिल थुल तालुका अध्यक्ष अर्जुन शिरसाट, सुरेश पिसे, अध्यक्ष वणी शहर कामगार सेल, वणी शहर सां. न्या. उपाध्यक्ष अमर नगराळे तसेच वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांची विशेष उपस्थिती होती.