•आ.प्रतिभाताईंचा बैलगाडी मोर्चा ठरला लक्षवेधी.
अजय कंडेवार,वणी:-शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे हतबल झाला आहे. प्रशासनाकडून त्यांच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. केंद्र सरकारच्या या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ, ता.23 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांचा हिताचा विविध मागण्यांसाठी “शेतकरी आक्रोश मोर्चा” तहसील कार्यालयावर धडकला. या काँग्रेसचा मोर्चाला वरोरा-भद्रावती मतदार संघाच्या विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकर यांनी संबोधन केलें
केंद्र सरकारच्या दडपशाही धोरणाने शेतकरी,कष्टकरी, व्यावसायिक, बेरोजगार युवक, लहान व्यावसायिक तथा सामान्य माणूस पुरता भरडल्या गेला आहे. शेतमालाला भाव नाही, प्रत्येक वस्तूवर अवाजवी कर आकारणी, पडलेले पिकाचे भाव, अनाठायी आयात धोरण, अशी दडपशाही चालू आहे. परिणामी ऐनवेळी शेतमालाचे भाव जाणीवपूर्वक पाडण्याचा कुटील डाव केंद्र सरकार साधत असल्याचे आरोप काँग्रेसने केला आहे.या केंद्र सरकारच्या दडपशाही धोरणाविरुद्ध २३ फेब्रु.शुक्रवारी “शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन वणी विधानसभा काँग्रेस कमिटीने केले. हा “शेतकरी आक्रोश मोर्चा ” रंगनाथ स्वामी मंदिरा जवळून -गांधी चौक -खाती चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा पायदळ सरकार विरुद्ध घोषणाबाजी करत निघाली व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जाहीर सभा घेण्यात आली.
या सभेला माजी आ. कासावार,वरोरा-भद्रावती मतदार संघाच्या विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकर, देविदास काळे, संजय खाडे व अरुणा खंडाळकर यांनी संबोधन केले.”शेतकरी आक्रोश मोर्चाचे” नेतृत्व वरोरा-भद्रावती मतदार संघाच्या विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले.
या “शेतकरी आक्रोश मोर्चात जय जगन्नाथ मल्टीस्टेट क्रेडिट को सोसा.वणी बँकेचे अध्यक्ष संजय खाडे,अध्यक्ष रंगनाथस्वामी नागरी सह पतसंस्था देविदास काळे, डॉ.महेंद्र लोढा,नरेंद्र ठाकरे, राजा पाथ्रडकर, अरूणाताई खंडाळकर, वणी तालुका अध्यक्ष घनश्याम पावडे, वणी, झरी, मारेगाव तालुक्यातील, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक आणि सर्वसामान्य जनता ,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.