•काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला वणी उपविभागात उस्फुर्त प्रतिसाद.
अजय कंडेवार,वणी :- वणी विधानसभा क्षेत्रात गावा- गावात जाऊन तेथील जनतेसोबत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी व काँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी माजी आमदार वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य समन्वयक डॉ.लोढा यांनी आज दिनांक 10 सप्टें.रोजी तालुक्यातील बोरगांव, खांदला, कुर्ली, शिंदोला, वेळाबाई, मोहदा,कृष्णानपुर, टुंड्रा या मार्गे जनसंवाद यात्रा काढण्यात आली . या काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला वणी उपविभागात उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. येणाऱ्या काळात बदल नक्कीच होईल असा विश्वास जनतेककडून बोलल्याही जात आहे.
मागील नऊ वर्षांमध्ये मोदी सरकारने जीवनावश्यक वस्तूंसह महागाई करून निवडणुकीच्या एक वर्ष अगोदर दोनशे रुपयांनी सिलेंडर दर कमी करून जनतेची काळजी असल्याचे दाखवत आहेत. ज्या महिला भगिनींनी मागील पंचवार्षिक निवडणुकीत डोळे झाकून मतदान केले. त्या महिला व नागरिकांनी आता विचार करून मतदान करावे लागेल. भाजप सरकारच्या भूलथापांना बळी पडू नये येणाऱ्या चार पाच महिन्यात पेट्रोल डिझेल देखील साठ रुपये वर येईल.कारण जनतेचा रोष वाढल्याने महागाई कमी येईल .पण बारा लाख कोटींची कर्ज उद्योजकांची कर्ज माफ केली पण गरीबाचे अश्रू पुसण्याचे काम केले नाही. सत्तेसाठी दुसऱ्याचे पक्ष फोडण्याचे काम केले.भाजप भविष्यात सत्तेत येणार नाही याचा आत्मविश्वास असल्याने काँग्रेसने कार्य देखील सुरू आहे. येणाऱ्या काळात आपल्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याचे काम काँग्रेस करेल यासाठी भविष्यात चांगल्या पद्धतीने काम करून विकास करूया असा विश्वासही डॉ.लोढा (मुख्य समन्वयक जनसंवाद यात्रा) यांनी केला आहे.
यात्रेच्या चौथ्या दिवशी डॉ.लोढा यांनी रविवार दि.10 सप्टें.तालुक्यातील बोरगांव, खांदला, कुर्ली, शिंदोला, वेळाबाई, मोहदा,कृष्णानपुर, टुंड्रा येथील ग्रामस्थांसमवेत संवाद साधला.यावेळी काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार, मुख्य समन्वयक डॉ.महेंद्र लोढा, तालुका अध्यक्ष घनश्याम पावडे, संजय खाडे,मोरेश्वर पावडे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.