Ajay Kandewar,Wani:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दोन दिवस यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्याकरिता वणीत होत असलेल्या सभेची तयारी सुरू झाली आहे.उबाठा गटाचे अधीकृत उमेदवार संजय देरकर व महाविकास आघाडीमधील नेत्यांना तसेच माझा समस्त जनतेस वणी येथील पाण्याच्या टाकीजवळील शासकीय मैदानात सोमवार ११ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी १० वाजता सभा होणार आहे.या ऐतिहासिक सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना (उबाठा) चे उमेदवार संजय देरकर यांनी महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले आहे.
•आदरणीय तमाम मतदार बांधव आणि भगिनींनो….
“आपल्या मतदारसंघातील विकास आणि आपल्या हक्कांच्या रक्षणासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. या कार्याला अधिक बळकटी देण्यासाठी आणि आपल्या समस्या समजून घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय श्री. उद्धव ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत एक विशेष सभा आयोजित केली आहे तरी आपले प्रश्न मांडण्याची एक सुवर्णसंधी आहे.त्यामुळे आपण सर्वांनी या सभेला लाखोंचा संख्येने उपस्थित राहून या सभेचे साक्षीदार व्हा …ही विनंती.- संजय नीलकंठ देरकर.(महाविकास आघाडीचे उमेदवार)