अजय कंडेवार,वणी:- लोकसभा निवडणुक-२०२४ च्या अनुषंगाने केंद्रीय निवडणुक आयोग, मुख्य निवडणुक आयोग महाराष्ट्र राज्य, मुंबई व पोलीस महासंचालक म.रा. मुंबई यांनी संदर्भीय निर्देशानुसार आणि निर्धारीत केलेल्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे अमरावती परीक्षेत्रांतर्गत सहा.पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा निर्णय 24 फेब्रू रोजी घेण्यात आला होता. त्यानुसार शिरपूर येथील ठाणेदार संजय राठोड यांची अमरावती ग्रामीण येथे बदली झाल्याने शिरपूर पोलीस स्टेशनचे नवीन शिलेदार कोण ?याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी API माधव शिंदे यांच्याकडे शिरपूर पोलीस स्टेशनचे सूत्र सोपविले आहे. स.पो. नि माधव शिंदे यांनी शुक्रवार 1 मार्च रोजी शिरपूर ठाणेदार पदाचे सूत्र स्वीकारले.
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पवन बनसोड यांनी शनिवारी वणी उपविभागातील तब्बल तिन्ही ठाणेदारांचा बदल्या करण्यात आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांचे खांदेपालट केले होते. बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये शिरपुरचे ठाणेदार API संजय राठोड यांची बदली अमरावती ग्रामीण मध्ये करण्यात आली होती. आता त्यांचा जागी वणी पोलीस स्टेशनचें धडाकेबाज अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेले पोलीस अधिकारी API माधव शिंदे यांनी पदभार स्वीकारला आहे.
त्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम-२२ न, पोट कलम (२) अन्वये परीक्षेत्र स्तरावतील पोलीस आस्थापना मंडळ यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन अमरावती परीक्षेत्र पोलीस आस्थापना मंडळ यांनी खालील सहा.पोलीस निरीक्षकांच्या बदलीस मान्यता दिली होती हे विशेष.