…•उपविभागीय अधिकारी वणी यांना निवेदनातून मागणी…
अजय कंडेवार,वणी :- शेतकऱ्यांच्या विविध अडचणी लक्षात घेता तसेच रस्त्याची स्थिती त्यामुळे होत असलेला शेतकरी वर्गाला त्रास, अपघात त्यामुळे तालुक्यातील शिंन्दोला येथे कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत सीसीआय कापूस खरेदी सुरु करण्यात यावी करिता युवासेना उपतालुका प्रमुख यांनी उपविभागीय अधिकारी वणी यांना निवेदनातून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडीत साकडे घातले आहे.
शिंदोला परिसरात अंदाजे 50 ते 70 गावात कापुस उत्पादक शेतकरी आहे. त्या सर्व शेतकऱ्यांचा कापुस आज घरामध्ये आहे. मागील काही दिसवसापासून वणी कृषी उत्पन्न बाजार समितीतील सीसीआय कापूस खरेदी बंद आहे. शिंदोला परिसरातील शेतकरी वर्ग कापूस वणीला नेत असताना कित्येकदा रस्ता नादुरुस्त असल्याने कापसाचे वाहन पलटी होऊन अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे शेतकरी राजा नाहक अडचणीत सापडत आहे. शेतकऱ्यांच्या विविध अडचणी लक्षात घेता शिंदोला कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सीसीआय कापुस खरेदी सुरू करावी या मागणी चे साकडे युवासेना उपतालुका प्रमुख आयुष ठाकरे यांनी उपविभागीय अधिकारी वणी यांना निवेदनातून दिनांक 9 फेब्रुवारी रोजी दिले.
यावेळी, शिवसेना (उबाठा) उपजिल्हा प्रमुख शरद ठाकरे, आयुष ठाकरे, संभा मते, जीवन डवरे, पद्माकर देरकर, गणेश लिंगे, सुधाकर गेडाम, महेश बोबडे, मीनात काकडे, वैभव गायकवाड, राजू वांढरे उपस्थित होते.