•’शाळा व्यवस्थापन समिती’ ठाणेदाराचा दालनात
अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील राजूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक हिंदी शाळा,येथे मागील काहीं दिवसापासून अज्ञात चोरटयांनी धुडगूस घातला. त्यांनी वर्गखोल्यांचे कुलूप तोडून जवळपास पुस्तकी साहित्याचे व खिडक्यांचे नुकसान केले.परिसरातील इतर शाळेच्याही सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.या चोरट्यांना वेळेवर आळा घाला अन्यथा चोरीची मोठी घटना निर्माण होऊ शकते व गावात पोलिसांची रात्रीची गस्त वाढवावी याकरीता ‘शाळा व्यवस्थापन समितीने वणी ठाणेदार यांना निवेदनातून मागणी केली.Thieves’ rampage in the school. ‘School Management Committee’ in Thanedar’s hall. ” या अगोदरही झाली होती एकदा याच शाळेची कुलूप तोडणी….पण पोलिसांकडून कोणतीही उपाययोजना न झाल्याची शाळा व्यवस्थापन कमिटीची बोंब……! आणि आता दुसऱ्यांदा जबाबदार कोण?”
जिल्हा परिषद उच्च हिंदी प्राथमिक राजूर शाळेच्या इमारतीत अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला आणि खिडक्यांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. तसेच वर्गखोल्यांचे कुलूप तोडले. त्यानंतर शैक्षणिक साहित्यासह नासधूस केली. शाळेत असल्याप्रकारचे होत असलेल्या तोडफोडीबाबत शिक्षकांनी शाळा व्यवस्थापन कमिटीला सांगितले तसेच परिसरातील काही नागरिकांनीही कळवले.
त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांसह, अन्य शिक्षकांनी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह अक्रम सिद्दीकी यांनीही त्वरित शाळेत धाव घेतली व पाहणी केली. गावात सुरक्षेचा प्रश् एरणीवर आला आहे. म्हणून राजूर गावात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी .