•जनतेनी अफवांवर विश्वास ठेवू नका असे एसडीपीओ यांचे आवाहन
सुरेंद्र इखारे, वणी – पोलिस स्टेशन वणी हद्दीमध्ये 56 गावे असून प्रत्येक गावाची जबाबदारी पोलिसांवर आहे. परंतु आज रोजी पो स्टे वणी येथे हजर तैनात मनुष्य बळपेक्षा 40 टक्के मनुष्यबळ कमी असताना सुद्धा यावर्षी च्या विविध सण उत्सवात योग्य नियोजन व प्रभावी प्रतिबंध कार्यवाही करून सण उत्सव आनंदाने व शांततेत पार पाडण्या करिता तसेच वेगवेगळे आंदोलने ,मोर्चे, निदर्शने, पूर परिस्थिती हाताळून कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ न देता अफवांमुळे तात्काळ पोलीस विभागाला चोऱ्या व मुलांचे अपहरणाबाबतचा खुलासा पत्रकार परिषदेत एसडीपीओ संजय पुज्जलवार यांनी केला आहे.
मागील वर्षीचे तुलनेत संपत्ती विषयक गुन्ह्यात जबरी चोरी 4, चोरी 16 याप्रमाणे घट झालेली आहे. विनयभंग सारखे गुन्ह्यात 14 ने घट, संपत्ती विषयक गुन्ह्यात चोरीस नेलेले एकूण 27 लाख 63 हजार 895 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे .त्याचप्रमाणे 55 टक्के पेक्षा जास्त आहे .तसेच फसवणुकीचे व इतर उघडकीस न आलेले गुन्ह्यामध्ये सायबर सेल स्थागुशा पोलीस स्टेशन वणी तर्फे आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले आहे. तसेच वणी परिसरातील अवैध धंद्यांवर छापे मारून अवैद्य व्यावसायिकांचे समूळ उच्चाटन करण्याचा प्रयत्न केला आहे यामध्ये 67 जुगार, 21 अवैद्य गुटखा यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही . परंतु 4 ऑक्टोबर 2022 रोजी रविनगर येथे एका बालकास अज्ञात इस्मानी एका कारमध्ये बसवून पळवून घेऊन जाण्याचा प्रयत्न झाल्याबाबत माहिती प्राप्त होताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ धाव घेतली असता असा कोणताही अपहरणाचा प्रकार घडून आला नाही असा खुलासा करण्यात आला आहे. तसेच 6 ऑक्टोबर2022 रोजी साईंगरी येथे एका बालकास अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याबाबत माहिती प्राप्त होताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ घटनेची सत्यता पडताळली असता असा कोणताही प्रकार घडून आला नाही त्या बालकास त्यांच्याच नातेवाईकाने दुचाकीवर बसण्यास सांगितले असे निष्पन्न झाले आहे.परंतु अश्या काही घटनांच्या संदर्भात पोलीस विभागाने विषयाचे गांभीर्य विचारात घेऊन पत्रकारांना माहिती देण्यास सहकार्य करावे जेणेकरून चुकीची माहिती प्रकाशित होणार नाही . परंतु अफवांमुळे झाल्याने संपूर्ण वणी शहरात गोंधळ निर्माण झाला,अशी माहिती पत्रकार परिषदेतील चर्चेत दिसून आली होती.
त्यामुळे पोलीस विभागाने तात्काळ पत्रकार परिषद बोलावून वरील घटनेची कोणतीही शहानिशा न करता सामान्य जनतेत पालक वर्गात व लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, अश्या अफवांबाबतींत जनता पोलिसांवर रोष व्यक्त करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकतात. तेव्हा नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की, अश्या अफवांवर विश्वास ठेवू नये व अश्या खोट्या अफवा पसरविणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असे पत्रकार परिषदेत उपस्थित एसडीपीओ संजय पूजजलवार, ठाणेदार रामकृष्ण महल्ले व पो.नी माया चाटसे यांनी सांगितले आहे.