Ajay Kandewar,वणीः- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त ९ मार्च रोजी नांदेपेरा रोडवरील शांतिमाल हॉस्पिटल वणी येथे सकाळी १० वाजता महिलांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात गर्भाशय कॅन्सर व एचपिव्हि लस या संदर्भात मोफत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच गर्भधारणेच्या पुर्वी बिजसंस्कार विधी या विषयावर या शिबिरात डॉ. संचिता विजय नगराळे (MBBS, MD, DGO गोल्डमेडालिस्ट व वैद्य सुवर्णा चरपे, (श्री विश्व आयुर्वेद व पंचकर्म उपचार केंद्र वणी) या स्त्रियांचे गंभीर आजार व त्याबाबतची जागृती या बाबत मौलिक मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. संचिता नगराळे या गर्भाशय कॅन्सर जागृतता व एपिव्हि लस याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तर वैद्य सुवर्णा चरपे या गर्भधारणेच्या पुर्वी बिजसंस्कार विधी यावर महिलांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे महिलांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.