•स्थानिक पदाधिकाऱ्यांचे नावच पत्रकात गायब.
•स्थानिक नेत्यांचे पक्षातून मूल्य संपले की काय ? सर्व सामान्यांना पडला प्रश्न.
अजय कंडेवार,वणी :- येथील वंचित बहुजन आघाडीतील स्थानिक नेत्यांना डावलून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वाघोबा खंडोबा देवस्थान सभागृहात शनिवारी दिनांक १० फेब्रूवारी रोजी दुपारी १२ वाजता वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ता मेळावा आयोजित केल्याने स्थानिक नेत्यांचे मूल्य पक्षातून संपले की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड चर्चेला ऊत आला आहे.
☝️वरील पत्रकात स्थानिक पदाधिकाऱ्यांचे नावच गायब.
आयोजित या मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून वंचितचे जिल्हाध्यक्ष निरज वाघमारे तर उद्धाघटक म्हणून पांढरकवडा येथील महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा ऍड. शिला जलपतकर तर प्रमुख अतिथी म्हणून ऍड. श्याम खंडारे व भारती पेंदोर उपस्थित असणार आहे. असे पत्रक परिसरात प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पत्रकात वणीतील स्थानिक पातळीवर असलेल्या कोणत्याच पदाधिकाऱ्याची उपस्थितीत नसल्याने हा मेळावा नेमका कोणाचा आहे. असे अशी चर्चा दिसून येत आहे.
स्थानिक ठिकाणी वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवा आघाडीचे जिल्हा पातळीपर्यंत महत्वाचे पदाधिकारी असताना यातील एकाही पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले नाही. त्यामुळे या नेत्यांची पक्षात किंमत उरली की नाही असा प्रश्न निर्माण झाला असून त्यांची जागा तर त्यांना दाखविण्यात येत नाही ना अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.
येणाऱ्या काळात स्थानिक पदाधिकाऱ्यांवर राजीनामा देण्याची वेळ आली का? अशी खमंग चर्चा.