•विदर्भातील ख्यातनाम साहित्यिक व लेखकांचे लाभणार मार्गदर्शन
अजय कंडेवार,वणी:- प्रसिद्धी माध्यमांचे भविष्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डिजिटल मिडियाचा माध्यमातून एक दिवसीय कार्यशाळा शनिवार 25 फेब्रुवारी रोजी 11 ते 5 वाजेपर्यंत व रविवारी 26 फेब्रुवारी रोजी उद्घाटन समारंभ सकाळी 11 वाजता, वसंत जीनिंग हॉल, वणी येथे व्हॉइस ऑफ डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचा वतीने आयोजित करण्यात आले आहे.
शनिवार 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.000वाजता एक दिवसीय कार्यशाळेचे उदघाटक म्हणून आशिष खुलसंगे (अध्यक्ष-दि वसंत जिनिंग को. ऑप. सो. वणी), कार्यक्रमाचे अध्यक्ष राजु उंबरकर (राज्य उपाध्यक्ष-महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वणी) राहणार आहेत व प्रमुख अतिथी म्हणून पी.एस.आंबटकर (संचालक MSPM’S ग्रुप),तारेन्द्र बोर्डे (माजी नगराध्यक्ष न.प. वणी),संजय खाडे (अध्यक्ष रंगनाथस्वामी अर्बन निधी लि. वणी तथा संचालक वसंत जिनींग अॅण्ड प्रसिंग फॅक्टरी वणी) तसेच या कार्यशाळेचे प्रसिद्ध प्रमुख वक्ते दिपक गोविंद रंगारी हे आहेत ते मराठी भाषा व्याकरण व प्रसार माध्यम यावर त्यांच व्याख्यान होणार आहे.तसेच वक्ते कल्याण कुमार हे देखील प्रसिद्ध व्याख्याते डिजिटल मिडीया आणि कायदा या विषयावर व्याख्यान करणार आहे.
तसेच २ रा दिवस हा उद्घाटन सोहळा रविवार दि. २६ फेब्रुवारी २०२३ वेळ ,दुपारी १२.०० वाजता,वसंत जिनिंग सभागृह, वणी येथे असणार आहे .या कार्यक्रमाचे उद्घाटक राहुल पांडे (राज्य माहिती आयुक्त) यांची विशेष उपस्थिती असणार आहे व कार्यक्रमाचे अध्यक्ष शैलेश पांडे (संपादक तरुण भारत डिजिटल सदस्य महाराष्ट्र शासन मराठी चित्रपट परीक्षण व अनुदान निर्धारण समिती), प्रमुख वक्ता म्हणून देवेंद्र गावंडे (संपादक लोकसत्ता,नागपूर) तसेच प्रमुख अतिथी सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर (खासदार-वणी चंद्रपुर-आर्णी,लोकसभा क्षेत्र), हंसराज अहिर (अध्यक्ष ,राष्ट्रीय ओबीसी आयोग, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री, भारत सरकार),संजीवरेड्डी बोदकुरवार (आमदार, वणी विधानसभा क्षेत्र),राजू उंबरकर(राज्य उपाध्यक्ष, मनसे),विजय चोरडिया (प्रदेश कार्यकारीणी सदस्य, भाजपा) व आशीष खुलसंगे(अध्यक्ष दि. वसंत जिनिंग को. सो, वणी) यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
वणीत प्रथमच पत्रकार ,वकील, शिक्षक व जाणत्या वर्गासाठी पहिल्यांदाच आयोजित करण्यात आले आहे. या कार्यशाळेत वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील पत्रकार तसेच पत्रकारिता क्षेत्रात नव्याने येऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष राजू निमसटकर यांनी केले आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी 9403456781 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.