अजय कंडेवार, वणी: वेकोली वणी क्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या निलजई सुंदर नगर फिल्टर प्लांट मधील रस्ता निर्माणीचे बांधकाम करणारा एक ठेकेदार यांनी सब ऑडिट इंजिनिअर वाघमारे नामक यांच्या तर्फे सतत लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार सिबीआयला दिली.
. मार्गाचा कामाचे देयक पास करण्यासाठी लाचेची वारंवार मागणी केली. दरम्यान आज शुक्रवार रोजी वेकोली वणी क्षेत्राच्या निलजई सब एरिया कार्यालयात Niljai Sub area office सांयकाळी पाच वाजताच्या सुमारास चौदा हजाराची लाच स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले. यामुळे संपूर्ण वेकोली क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. सिबीआयची कारवाई सूरू असल्याची माहीती आहे. एव्हढीच माहिती मिळाली पुढील चौकशी सुरू आहे.