Tuesday, February 17, 2026
HomeBreaking Newsविरोधकांना 'फटाका' लागला, भाजपाचा 'युवक बॉम्ब फुटला........

विरोधकांना ‘फटाका’ लागला, भाजपाचा ‘युवक बॉम्ब फुटला……..

•गोवारी–ब्राह्मणीतील युवकांची भाजपात "एन्ट्री".

अजय कंडेवार, वणी : पंचायत समिती, नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुल वाजताच वणी तालुक्यातील राजकारणात नव्या वाऱ्यांची झुळूक वाहू लागली आहे.गोवारी व ब्राह्मणी गावातील (नांदेपेरा – वेल्हाळा) गटात उत्साही युवकांनी भाजपाच्या विचारसरणीवर विश्वास ठेवत आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांच्या नेतृत्वाने पक्षात जाहीर प्रवेश केला.सध्यातरी या प्रवेशाने विरोधकांचा तंबूत खळबळ उडाली आहे.

गोवारी–ब्राह्मणीतील(नांदेपेरा – वेल्हाळा गट) हा प्रवेश केवळ प्रतीकात्मक नाही, तर वणी तालुक्यातील राजकीय नकाशावर मोठा ठसा उमटवणारा क्षण आहे.युवकांनी आता ठरवलंय विकासासाठी एकच मार्ग, तो म्हणजे भाजपाच.अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात उत्साहाचा जल्लोष केला.या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात एक वेगळाच हलकल्लोळ निर्माण झाला आहे.विरोधकांना या युवकांच्या संघटीत प्रवेशामुळे ‘धोक्याची घंटी’ वाजल्याची चर्चा वणी येथील राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.भाजपासाठी हा प्रवेश जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत निर्णायक टप्पा ठरू शकतो.वणी तालुक्यात युवकांचा वाढता कल, संघटनेची काटेकोर रणनीती आणि अनुभवी नेत्यांचा पाठिंबा या तिहेरी फॉर्म्युल्यामुळे भाजपासाठी विजयाचे पोषक वातावरण निर्माण झाले आहे.विशेष म्हणजे, वणी शहरात महिलांचाही सक्रिय सहभाग दिसून येत आहे.

या प्रवेश सोहळ्यात निलेश सातपुते, निलेश खिरटकर, गौरव येरेकर, आदित्य आवारी, पलाश चामाटे, समीर गोडे, नितेश आवारी, शुभम, प्रवीण डाखरे, सुरज आवारी, प्रमोद मंगाम, तुषार आवारी, यशवंत कुत्तरमारे, शंकर आवारी, हेमंत कुत्तरमारे, निलेश नंदरे आणि सुनील बांगडे या युवकांनी पक्ष प्रवेश केला.या युवकांची एकजूट आणि संघटनशक्ती पाहता, स्थानिक राजकीय समीकरणे नव्याने आखली जातील,अशी चर्चासुद्धा रंगली आहे.या प्रसंगी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर, प्रदीप जेऊरकर, हेमंत गौरकार, संतोष गोवर्दीपे, सरपंच दीपक मत्ते, प्रभाकर बोडे, मंगेश जेणेकार,अशोक सूर व नितीन देरकर यांची विशेष उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments