अजय कंडेवार,वणी – विद्यार्थी-पालक व शिक्षकांमध्ये संवाद व्हावा, विद्यार्थ्याची प्रगती समजावी या उद्देशाने “मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी सिटी ब्रांच ” येथे दि.१५ जाने ते १८ जाने अश्या तीन दिवसीय सभा शाळेचे संचालक पी . एस आंबटकर यांच्या मार्गदर्शनात “शिक्षक-पालक “सभेचे आयोजन शाळेचा मुख्याध्यापिका शोभना यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
२०२४-२५ या शैक्षणिक सत्रातील पहिल्या सहविचार सभेत नर्सरी ते वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व नवीन संकल्पना हा मुद्दा केंद्रस्थानी ठेऊन विविध विषयांवर पालकांशी चर्चा करण्यात आली.मॅकरून सिटी ब्रांच येथे पहिल्यांदाच झालेल्या या तीन दिवसीय. “शिक्षक-पालक” सभेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यासाठी शाळा हे कुटुंबा नंतर महत्वाची भूमिका बजावत असते. त्या दृष्टीने शाळेमध्ये राबवले जाणारे सहशालेय उपक्रम तसेच अभ्यासक्रम, शारीरिक कसरती साठी क्रीडा स्पर्धा, गुणवत्ता वाढीसाठी केले जाणारे प्रयत्न, मार्गदर्शन, वेगवेगळ्या परीक्षा, क्रीडा स्पर्धा मध्ये मुलांनी मिळवलेले यश, शाळेत राबवले जाणारे उपक्रम यासाठी शिक्षक-पालक साधण्याचे काम करत असतो.
या तीन दिवसीय सहविचार सभेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व नवीन संकल्पना हा मुद्दा केंद्रस्थानी ठेऊन विविध विषयांवर चर्चा आली . या तीन दिवसीय सभेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.सभेचा सरतेशेवटी द्वितीय घटक चाचणीचा निकाल जाहीर करण्यात आला.यावेळी पालक -शिक्षक समितीचे पदाधिकारी,पालकवर्ग व शिक्षक उपस्थित होते.