•A.P.I सीता वाघमारे “ॲक्शन मोड” मध्ये.
•अपघात टाळण्यासाठी सुरक्षात्मक उपाययोजना.
अजय कंडेवार,वणी:- मागील काही दिवसापूर्वी समृद्धी महामार्गावर खासगी बसच्या अपघातात काही प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. त्या अपघातातील बसचा चालक मद्य सेवन करून असल्याची धक्कादायक प्रकार अहवालातून समोर आला होता, या पार्श्वभूमीवर अशी घटना पुन्हा घडू नये,यासाठी वणी वाहतूक शाखेत नव्याने रूजू झालेल्या A.P.I सीता वाघमारे यांचा वतीने विशेष काळजी घेतली जात आहे.Alcohol check of drivers.A.P.I Sita Waghmare in “Action Mode”.Safety measures to prevent accidents.
विभागाच्यावतीने लांब पल्ल्याच्या बसचालकांची व ऑटोचालकांची मद्य तपासणी व कागदपत्रे तपासणी जोमात करण्यात येत आहे. आतापर्यंत अनेक बसचालकांची तपासणी करण्यात आली असून ही तपासणी यापुढे नियमितपणे सुरू राहणार आहे.काही दिवसांपूर्वी समृध्दी महामार्गावर सिंदखेड राजाजवळ खासगी बसचा अपघात झाला होता. अपघातानंतर बसने पेट घेतल्याने काही प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर परिवहन विभाग सुरक्षेच्या अनुषंगाने विविध उपाययोजना वणी वाहतूक शाखा करत आहे. त्या अनुषंगानेच खासगी बस विशेषतः चंद्रपूर ते पुणे चालणाऱ्या ट्रॅव्हल्स यांना चेक करून वाहनाचे कागदपत्र तपासले तसेच इमर्जन्सी एक्झिट डोअर चालु आहेत की नाही,हॅमर तसेच अग्निशामक स्प्रे उपलब्ध आहेत किव नाही,ट्रॅव्हल्स चे चालक मद्य सेवन करून आहेत का याबाबत तपासण्या करण्यात आली.
वणी वाहतूक शाखेच्यावतीने गेल्या 2 दिवसांपासून ही तपासणी अन्य ठिकाणाहून (चंद्रपूर) येथून येणाऱ्या आणि यवतमाळ येथून प्रवासी घेणाऱ्या किंवा उतरविणाऱ्या बस चालकांची देखील मद्य तपासणी करण्यात येत आहे.या तपासणीमध्ये विशेषत: खासगी व स्लीपरकोच बस चालकांवर भर देण्यात आला आहे. बस चालकांना थांबवून ब्रीथ अॅनालायझरद्वारे ही तपासणी करतात. आतापर्यंत अनेक ?बसचालक व ऑटोचालकांची तपासणी करण्यात आली आहे. बसचालक आपल्यासोबत अनेक प्रवाशांना घेऊन जात असतो. प्रवाशी देखील चालकाच्या विश्वासावर बसने प्रवास करतात. त्यामुळे चालकाचीदेखील प्रवाशांना सुरक्षितपणे घेऊन जाण्याची जबाबदारी आहे. चालकांनी या जबाबदारीचे पालन करावे. बस चालविताना सुरक्षितपणे चालवावी आणि कोणत्याही प्रकारचे मद्य प्राशन करू नये. मद्य प्राशन केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.यापुढेही सदर तपासणी मोहीम नियमितपणे सुरू राहणार असल्याचे A.P.I सीता वाघमारे यांनी सांगितले. या मोहिमेत जमादार गोपाल हेपट, राजू बागेश्वर ,रामदास धोंगडे, किशोर डफडे व महेश राठोड यांचा सहभाग होता.