• सहकार क्षेत्रात देविदास काळे यांचा नेहमीच राहिला दबदबा…..
• प्रचाराचे नारळ फुटले…..
अजय कंडेवार,वणी – येत्या 6 नोव्हेंबर 2022 रोजी होऊ घातलेल्या वणीच्या नामांकित दि वसंत को ऑपरेटिव्ह शेतकरी जिनिंग प्रेसिंग फक्ट्री या संस्थेच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदा चार पॅनल उभे ठाकल्याने वसंत जिनिंगची चौरंगी लढत दिसून येत आहे.

वसंत जिनिंगची 17 जागेसाठी 63 उमेदवार रिंगणात असून या उमेदवाराचा समावेश चार पॅनेलमध्ये आहे त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वातील परिवर्तन पॅनल , विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी एकता परिवर्तन पॅनल , भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अनिल हेपट यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी ब्रिगेड, शेतकरी संघटना, मिळून वसंत जिनिंग बचाव पॅनल तर दि. वसंत को.ऑपरेटिव्ह शेतकरी जिनींग अँड प्रेसिंग फॅक्टरी संचालक मंडळ निवडणुक २०२२ जय सहकार पॅनल ….रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष ऍड देविदास काळे यांच्या नेतृत्वातील “जय सहकार पॅनल” अशी एकूण 63 उमेदवारांचे चार पॅनल निवडणुकीत उभे करून मतदारात संभ्रम निर्माण केला आहे. विशेषता सहकार पॅनलने कार्यालयाचे उद्घाटन करीत प्रचाराला प्रारंभ केला आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होईल असे काही जाणकारांचे मत आहे. कारण मागील दोन टर्म ऍड देविदास काळे यांनी वसंत जिनिंगचा सांभाळ अत्यंत व्यवस्थित केला आहे. त्यातल्या त्यात रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या निवडणुक जिंकल्याने पुन्हा त्यांना अध्यक्षपद बहाल करण्यात आले आहे .

त्यामुळे या चौरंगी निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. विशेष मागील अनेक वर्षांपासून ऍड. देविदास काळे यांची वसंत जिनिंग मध्ये एकहाती सत्ता राहिली आहे. सहकार क्षेत्रात देविदास काळे यांचा नेहमीच दबदबा राहिला आहे.

या निवडणुकीत वसंत जिनिंगची एकूण 10 हजार 924 मतदार आहे ते सर्व मतदार या निवडणुकीत सहभागी होतील की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे उमेदवारांची दमछाक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे

दि. वसंत को.ऑपरेटिव्ह शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी च्या संचालक मंडळाची निवडणूक होत आहे. ऍड. देविदास काळे यांच्या नेतृत्वात जय सहकार पॅनल च्या माध्यमातून विजयबाबू चोरडीया, राजाभाऊ पाथ्रडकर, प्रशांत गोहोकार, प्रेमकुमार खुराणा, विलास मांडवकर, पवन एकरे, पुंडलिक भोंगळे, संजय पारखी, लुकेश्वर बोबडे, मोहन जोगी, अमोल ठाकरे, सुरेश बरडे, सुनील वरारकर, वंदना भोंगळे, मंदा पाचभाई, नामदेव सुरपाम हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.


