•उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस वणी भाजपा तर्फे ‘सेवा दिन ‘ म्हणून साजरा.
अजय कंडेवार,वणी:- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा दिवस ‘सेवा दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय प्रदेश भारतीय जनता पार्टीने घेतला आहे .या अनुषंगाने सेवा दिनाच्या माध्यमातून वणी भाजप पक्षाचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी,पदाधिकारी यांचा तर्फे दि.22 जुलै रोजी ग्रामीण रुग्णालयात प्रत्येक रुग्णांना ‘सकस आहार’ वाटप करण्यात आले.In Rural hospital will get “healthy food” from BJP throughout the year.Deputy Chief Minister Devendra Fadnavis’ birthday is celebrated as ‘Service Day’ by BJP.
वणी ग्रामीण रुग्णालय मध्ये वर्षभर दूध ,बिस्कीट हा “सकस आहार” देण्याचा निर्णय जिल्हाअध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचा सूचनेनुसार वणी भाजपने हा निर्णय घेतला आहे.यावेळी तारेंद्र बोर्डे (जिल्हाध्यक्ष,भाजपा),संजीवरेड्डी बोदकूरवार (आमदार, वणी विधानसभा) संजय पिंपळशेडे, विजय पिदूरकर (विधानसभा प्रमुख),दिनकर पावडे(ज्येष्ठ नेते) , किशोर बावणे, बंडू चांदेकर, महादेव खाडे ,स्मिता नांदेकर, शंकर बंदुरकर, अशोक सूर, दिपक मत्ते, पवन एकरे ,सचिन खाडे, नितीन वासेकर , संदीप बेसरकर,सत्यजित ठाकुरवार ,शुभम गोरे , शुभम इंगळे ,अनिल खंगार ,वैभव कवरासे, निखिल खाडे ,नितीन चहाणकर ,निलेश होले ,प्रीती बिडकर ,रजनी हिकरे, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
·