अजय कंडेवार, Wani:- विधानसभा निवडणुकीसाठी महाविकासातील ऊबाठा पक्षाने पहिल्या २५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उबाठाने संजय देरकर यांच्यावर विश्वास टाकला आहे. देरकर यांना उमेदवारी देत यादीतल्या पहिल्या ९ व्या क्रमांकावरच उमेदवारी जाहिर केली. परंतु काँग्रेसचा गड असताना वीस वर्षानंतर शिवसेनेचा कोट्याला गेली आहे. Announcement of name Sanjay Derkar from Vani Legislative Assembly.
वणी मतदारसंघात उमेदवारीवरून मोठा संघर्ष दिसून आला. यांच्याबद्दल उमेदवारीवरून काही अंतर्गत किरकोळ झालेला वाद समोर आला होता. मात्र वरिष्ठांनी जनतेचा विश्वास पाहून देरकर यांचा उमेदवारीचा मार्ग मोकळा केला.शिवसेना (उबाठा) पक्षाकडून विश्वास नांदेकर, संजय निखाडे व संजय देरकर यांचा प्रबळ दावा होता. पक्षश्रेष्ठींनी संजय देरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.