अजय कंडेवार,वणी :- वणी लॉयन्स इंग्लिश मिडियम स्कूल येथे भारतातील अलौकीक बुद्धीचे गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती काल दिनांक 22 डिसेंबर रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य श्री. प्रशांत गोडे व प्रमुख अतिथी म्हणून वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या दिपासिंग परिहार उपस्थित होत्या.
गणित दिवसाचे औचित्य साधून गणितावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. वर्ग ५ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. चार गटामध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत आर्यभट्ट हा गट विजयी तर भास्करा हा गट उपविजेता ठरला. यावेळी स्पर्धकांना बक्षिस व भेटवस्तु देऊन गौरविण्यात आले.
विद्यालयातील गणित शिक्षक गणेश कोल्हे, सुनिता खुसपुरे, मोहिनी गोहोकार, निलिमा बावणे यांनी कार्यक्रम आयोजित केला. स्पर्धेतील विजय भगत व पोर्णिमा काकडे यांनी गुणलेखनाची भूमिका पार पाडली.
अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य प्रशांत गोडे यांनी दैनंदिन जीवनातील गणिताचे महत्त्व व गणिताचा इतर विषयांशी समन्वय कसा असतो हे पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहिनी गोहोकार तर आभार सुनिता खुसपुरे यांनी मानले.