Tuesday, February 17, 2026
HomeBreakingवणी येथे सोमवारी काँग्रेसची तातडीची बैठक..

वणी येथे सोमवारी काँग्रेसची तातडीची बैठक..

•काँग्रेसच्या नव्या रणनीतीचे वळण ठरविणारी ठरू शकते.

अजय कंडेवार,वणी : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि चंद्रपूर- वणी -आर्णी लोकसभा खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या विशेष सूचनेने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्वात वसंत जिनिंग हॉल वणी येथे ता.१ सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. स्थानिक तसेच विधानसभा पातळीवरील पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती पक्ष सूत्रांकडून मिळाली आहे.

बैठकीत प्रामुख्याने मतदारसंघातील राजकीय समीकरणे, कार्यकर्त्यांची बांधणी, प्रचाराचा आराखडा तसेच स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याची शक्यता आहे. विशेषतः युवा कार्यकर्त्यांना सक्रीय करून जनतेपर्यंत पक्षाच्या धोरणे व भूमिका पोहचविण्याचा आराखडा चर्चेत येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.काँग्रेस पक्षाच्या मोठ्या नेतृत्वाकडून या बैठकीसाठी आवश्यक सूचना दिल्या असून, पक्षाच्या संघटनात्मक ताकदीवर पुनश्च भर देण्याचा प्रयत्न होणार आहे. तसेच, अन्य पक्षांच्या हालचालींना प्रतिसाद म्हणून काँग्रेसने कोणती भूमिका घ्यावी यावरही सविस्तर चर्चा अपेक्षित आहे.स्थानिक पातळीवर ही बैठक आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसच्या नव्या रणनीतीचे वळण ठरविणारी ठरू शकते, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.

 

 

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments