• जिल्हाधिकारी यांचा ‘ एक ‘ फतवा जाहीर….
अजय कंडेवार,वणी:- होळी,धुलीवंदन,छ.शिवाजी महाराज जयंती, गुढीपाडवा,श्रीराम नवमी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती या सारख्या सण उत्सवानिमित्ताने शांतता समितीची बैठक दिं.3 मार्च 2023 शुक्रवार रोजी पोलीस स्टेशनच्या प्रांगणात संपन्न झाली.
या बैठकीचा अध्यक्षस्थानी वणी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार हे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून ठाणेदार प्रदीप शिरस्कर, वाहतूक शाखा प्रमुख संजय आत्राम उपस्थित होते.यावेळी ठाणेदार प्रदीप शिरस्कर म्हणाले,”संपूर्ण सण उत्सव हे जिल्हाधिकारी कार्यालयातुन आलेल्या आदेशानुसार व आपला हिरमोड होणार नाही,अशी दक्षता घेऊन सर्व समाजबांधवांनी सर्व सण शांततेत साजरा करावयाचा आहे असे मत व्यक्त केले.”
तसेच वाहतूक शाखा प्रमुख संजय आत्राम म्हणाले,” सण उत्सवात नागरिकांना रस्त्यावरून चालताना त्रास होणार नाही व वाहतुकीची कोंडी होऊ नये .यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करू असे मत व्यक्त केले. “
तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार , ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांनी वणीच्या नागरिकांचे कौतुक केले कारण येथील सर्व समाज बांधव एकोप्याने सर्व सण उत्सव साजरे करतात व शांतता भंग होणार नाही याची दक्षता सर्व समाजबांधव व नागरिकांनी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. वणीचा नागरिकांचे संरक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे .तेव्हा पोलीस प्रशासनाकडून सहकार्याची भूमिका राहील असे आश्वासीत केले. होळी आणि रंगपंचमीला अनुचित प्रकार घडू नये,शांतता, सुव्यवस्था अबाधित रहाण्यासाठी तालुक्यातील ग्राम प्रमुख,ग्रामसुरक्षा दल आणि पोलीस पाटलांनी सजग रहावे. कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांना माहिती द्यावी. राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या घटनांचा ग्राम पातळीवर प्रभाव पडू नये यासाठी सूचना केल्या.
यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार व शांतता समितीचे सदस्य , नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे यशस्वीतेसाठी पोलीस विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
असा ” तो….” यवतमाळ जिल्हाधिकारी यांचा आदेश……………
” यवतमाळ जिल्हयात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37- (1). (3) अन्वये दि. 28.02.2023 चे 00.01 वा (मध्यरात्री पासुन) ते दि. 14.03.2023 चे 24.00 वा (मध्यरात्री पर्यंत) जमावबंदी आदेश लागू केलेला आहे. या आदेशामधुन (शासकीय, निमशासकीय, कर्मचारी यांचे धरणे / आंदोलन ई. वगळता) सुट देण्याचे अधिकार संबंधीत पोलीस स्टेशनचे अधिकारी यांना देण्यात आले आहेत. तसेच ज्या शासकीय / निमशासकीय कर्मचाऱ्यांना धरणे करावयाचे असेल त्याकरीता 05 पेक्षा अधिक संख्येने जमावयाचे असल्यास पोलीस अधीक्षक कार्यालय यांची पूर्व परवानगी घ्यावी लागेल. परवानगी मागण्याचा अर्ज आंदोलन करावयाच्या 10 दिवस अगोदर सादर करणे बंधनकारक असेल.”