Wani ,Ajay Kandewar:- तालुक्यातील रेती तस्करी आटोक्यात आलेली नाही स्थानिक तहसीलदाराची मूकसंमती की हतबलता ? कळायला मार्ग नाही परंतु तालुक्यातील रेती तस्करी जिल्हा दरबारात पोचलेली असतानाही रेतीची वाहतूक काही केल्या थांबलेली नाही रोज रात्री राजरोसपणे रेतीची तस्करी सुरू असल्याचे अनेक पुरावे हाती लागत आहेत.

यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्याकडून वणीतील त्या झोलां घाटावरील जबाबदार असलेले तलाठी, मंडळ अधिकारी व वणी तहसीलदारावर ठोस कार्यवाही होत नसल्यामुळे रेती तस्करी मधून शासनाला कोट्यावधी रुपये फटका बसलेला आहे. तालुक्यातील सर्व रेतीघाट रिकामे झालेले असताना प्रशासन अद्यापही झोपेचे सोंग घेत आहे. रेती तस्करी संपूर्ण गाजत असताना वरिष्ठांकडून वणी तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदारांना पाठीशी घालण्याचे काम होताना दिसत आहे त्यामुळे रेती तस्करी मधून होणारी लाखोंची उलाढाल नेमकी कोणाच्या फायद्याची ठरत आहे यावर संशय व्यक्त केल्या जात आहे या व्यवसायातून मिळकतीचे पाट यवतमाळ पर्यंत पोहोचले असल्याची माहिती महसूल प्रशासनातील अधिकारी-अधिकारी कर्मचाऱ्यांकडून ऐकू येत आहे.
चोरट्यांना लगाम लावण्यासाठी काही अधिकारी गनिमीकाव्याचा वापर करीत आहेत. परंतु वाळूमाफियांचे मोबाईल नेटवर्क , खादाड विवेकबुद्धीचा ‘वॉच’ पुढे ते फिके पडतात. एवढेच नव्हे, तर वणी तहसीलदार यांना चक्क महसूल अधिका-यांच्या नाकावर टिच्चून वाळूची अवैध वाहतूक सुरू आहे. कारवाई होते, ती फक्त नावालाच…वाळूच्या गोरखधंद्यात तर शासकीय यंत्रणेतील अनेक कर्मचा-यांची ‘मिलीभगत’ आहे. दिवाळीच्या कालावधीमध्ये काही दिवस अधिका-यांना सुट्या होत्या. तेव्हा त्यांना रान मोकळे होते. चोरट्यांच्या टोळया दिवसेंदिवस फोफावत आहेत.
•सिनेस्टाईल होते वाळू चोरी……..
वाळू चोरी सिनेस्टाईल चालते. तहसीलदार अथवा अन्य अधिका-यांवर वाळूमाफियांचे ‘पंटर’ रात्रंदिवस पहारा ठेवतात. साहेब कार्यालयात व घरी असताना सुद्धा…त्यांच्या हालचाली टिपण्याचे काम ते करतात. इंत्यभूत माहिती मोबाईल टू मोबाईल ते म्होरक्याला पुरवित असतात. वाळूचे ट्रॅक्टर रस्त्याने निघाल्यानंतर त्या पुढे एक मोटारसायकलवर तर मागे चारचाकी वाहनात असते. काही टोळ्या मिळून नाक्या-नाक्यावर माणसं अधिका-यांवर नजर ठेवून असतात. काही अधिकारी, कर्मचारी, तलाठी या धनाढ्य वाळूमाफियांच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत. त्यामुळे चोरट्यांना वाळू चोरीचे अन् भ्रष्ट अधिका-यांना हप्तयांचे ‘व्यसन’ जडले आहे आणि “विवेकबुद्धीची खादाडगिरी” वाढलेली आहे.रात्रीचे पथक ‘स्पॉट’वर जागे राहिले, तर ते गेल्यानंतर सकाळी वाळूची वाहतूक होते. अनेकदा चोरवाट वेगळीच असते. तिच ती वाहने पुन्हा कारवाईत सापडतात. ब-याच वाहनांवर नंबर प्लेटस् नसतात. परंतु त्याकडे संबंधित विभागाची डोळेझाक होत आहे.

