•सदर उपक्रमाचे कौतुकच.
अजय कंडेवार,वणी :- ‘स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव’ याचे औचित्यसाधून पोलीस प्रशासनातर्फे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात राष्ट्रीय ऐक्याचे अभिनव दर्शन घडले . यात जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.पवनकुमार बन्सोड व अपर पोलीस अधिक्षक डॉ.पियुश जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांचा मार्गदर्शनाखाली वणी उपविभागीतील पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर (ठाणेदार पो.स्टे वणी) स.पो.नि गजानन करेवाड (ठाणेदार पो.स्टे शिरपुर)पो.नि जाधव (ठाणेदार पो.स्टे मुकुटबन), स.पो.नि संदिप पाटील (ठाणेदार पो.स्टे पाटण) स.पो.नि संजय आत्राम (वाहतुक शाखा वणी) यांनी दि 16.मे रोजी वणी पोलीस स्टेशन येथथील दक्षता हॉल मध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन केले.या शिबिरात एकूण 1111 रक्तदात्यानी रक्तदान केले. त्यात 10 अधिकारी ,110 कर्मचारी व 72 होमगार्ड यांचा विशेष समावेश आहे. Record breaking ‘Magnificent blood donation’ in Wani sub-division.Appreciation of this initiative.
रक्ताची गरज लक्षात घेता वसंतराव नाईक शासकीय रूग्णालय यवतमाळ व त्यांचे सहकारी ब्लड बँक यांचे चमुने या शिबीरात रक्त संकलन केले. सदर रक्तदान शिबीरासाठी वणी, शिरपुर, मारेगाव येथील पोलीस पाटील, शिक्षण विभाग पंचायत समिती वणी, सिंधी समाज, शिव स्वराज युवा मंच, टि.डी.आर.एफ, स्माईल फाउंडेशन, राकेश खुराणा (व्यापारी संघटना),एम.एस.एफ, विविध खाजगी संघटना , महीला दक्षता समीती व कुणाल चोरडिया यांचे वाढदिवसानिमित्त दिव्यांगाना व्हील चेअरचे वाटपही करण्यात आले . हेही विशेष……
शिबीराचे यशस्वितेसाठी स.पो.नि माया चाटसे स.पो.नि माधव शिंदे, स.पो.नि दत्ता पेंन्डकर, पोउपनि हिरे, पोउपनि झिमटे पोलीस स्टेशन वणी तसेच पोलीस स्टेशन शिरपुर, मारेगाव, पाटण, मुकुटबन तसेच वाहतुक शाखा उपविभाग वणी येथील अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष परीश्रम घेतले.