Ajay Kandewar,Wani:- सुशिक्षीत आणि कुशल युवक – युवतींना यशस्वी करिअरची संधी मिळावी व जिल्ह्यात गुन्हेगारी वाढू नये,या उद्देशाने यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून यासाठी यवतमाळ जिल्हा पोलिस दलातर्फे ‘ऑपरेशन प्रस्थान’अंतर्गत “भव्य रोजगार” महोत्सवाचे आयोजन 22 फेब्रुवारी 2025 शनिवार रोजी वणी शेतकरी मंदिर येथे करण्यात आले .
विपुल खनिज संपत्तीने नटलेला भाग असलेल्या वणी मतदारसंघात १८ पेक्षा जास्त कोळसा खाणी आहेत तर त्यावर आधारित अनेक कंपन्या व उद्योग आहेत . तरी सुद्धा अनेक सुशिक्षीत युवा रोजगारापासुन वंचित आहे. याचाच परिणाम त्यांच्या कुटुंबावर होत आहे. तर रोजगार नसल्याच्या नैराश्यातून अनेक आत्महत्या झाल्याच्या घटना घडल्या तसेच गुन्हेगारी वाढत आहे,या समस्येवर तोडगा काढण्याच्या अनुषंगाने अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून रोजगार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. मागील महिन्यापासुन यवतमाळ पोलिसांकडून या विषयी प्रचार प्रसार करण्यात आला. तर अधिकाधिक बेरोजगारांच्या नोंदण्या यामध्ये करण्यात आल्या. तर तिन्ही तालुक्यांत विविध ठिकाणी मार्गदर्शकाकडून मुलाखत पूर्व प्रशिक्षण देण्यात आले.शिरपूर मारेगाव मुकुटबन पाटण पोस्टे हद्दीतील युवक व युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये ११०२ युवक व ११८ युवतींनी सहभाग नोंदविला. या रोजगार मेळाव्यामध्ये 10 वेगवेगळ्या कंपन्याचा सहभाग होता. या मेळाव्यात एकूण 1320 युवक व युवतींची मुलाखत घेण्यात आली .या मुलाखतीमध्ये पात्र उमेदवारांना लवकरच कंपनीकडून नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे .या मेळाव्याला उपस्थितांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
यावेळी वणी SDPO गणेश किंद्रे, वणी ठाणेदार P.I गोपाल उंबरकर, ,मारेगाव ठाणेदार संजय सोळंके ,मुकुटबन ठाणेदार दिलीप वडगावकर,शिरपूर ठाणेदार माधव शिंदे,पाटण ठाणेदार स्वप्निल ठाकरे, उपविभागातील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.