अजय कंडेवार,Wani: यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा मतदारसंघात महामंडळची सदस्य पदाची ” लॉटरी लागल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे.आता तर काँग्रेसच्या “तो” एक नामवंत तसेच सोबत शेकडो कार्यकर्त्याची फळी असणारा ” तो मोठा नेता”यवतमाळ जिल्हाध्यक्ष बाळासाहेब करमरकर व वणी विधानसभा प्रमुख आशिष मोहितकर यांच्या विशेष प्रयत्नाने स्वगृही प्रवेश घेतल्याची जोरदार चर्चा ऐकायला येत आहे .विशेष म्हणजे तो नेता “सत्तेवरील एका मंत्र्याचा” निकटवर्तीय असल्याचेही समजते. अगोदरचा पक्षात मिळणारी वागणूक बघता “तो नेता” घरवापसीचा झाल्याची माहिती जाणकरांकडून मिळत आहे .कदाचित त्या नामवंत नेत्याला वेळोवेळी डावल्याने “त्या”पक्षावर उघड नाराजी व्यक्त करीत होताच याआधी “तो मोठा नेता” पक्ष सोडून “स्वगृही वापसी” जाणार असल्याची चर्चा वणी मतदार संघात सूरूच होती. पण ते अधिकृत झाल्याचीही बतावणी सुरू आहे. “जर “घरवापसी” करीत अजित पवार गटचा राष्ट्रवादीत “एन्ट्री” झाली तर त्यासोबत असणारी कार्यकर्त्यांची मोठी फळी देखील प्रवेश घेण्याची दाट शक्यता आहे. यामुळं महायुतीला बळ मिळेल व मताधिक्यात वाढ होईल व काँग्रेसला जबर फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

यवतमाळ जिल्हाध्यक्ष बाळासाहेब करमरकर व वणी विधानसभा प्रमुख आशिष मोहितकर यांच्या विशेष प्रयत्नाने म.रा. उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्यमंत्री इंद्रनील नाईक तसेच वणीचा “तो मोठा नेता” यांच्यात वणी मतदारसंघाचा विकासाबाबत व आगामी निवडणुकीसंदर्भात काहीं तास बंद दारात चर्चा ही झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. या चर्चेत वणीला लवकरच महामंडळची “लॉटरी “वर शिक्कामोर्तब म.रा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याचे समजते.आता वणीकरांचा आशा पल्लवीत झाल्या आहे. नेमक ते पद मिळणार तरी कुणाला याकडे उत्सुकतेने वाट बघणे सुरू झाले.
•राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या विशेष प्रयत्नाने वणी महामंडळाच्या सदस्य निवड……
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महामंडळाच्या सदस्य निवडीचा महत्त्वाचा विषय गेल्या अनेक वर्षापासून रखडला होता.यावेळी अनेक पदाधिकारी, ज्येष्ठ नेत्यांनी महामंडळांवर नियुक्तीसाठी आपापल्या नेत्यांकडे शिफारस करून मोर्चेबांधणी करत असतात. परंतु राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या विशेष प्रयत्नाने “महामंडळ सदस्य पदाची” लॉटरी वणीला लागल्याची कुणकुण ऐकायला मिळत आहे.हे दरम्यान, वणीची महामंडळ सदस्य यादी निश्चित झाली असून या वेळी नियुक्त्या कुणाला मिळणार याची उत्सुकता देखील वणीकर सर्वांना आहे.

