Ajay Kandewar,Wani :- यवतमाळ जिल्ह्यातील वणी मतदारसंघ हा काँग्रेस बहुल मतदारसंघ म्हणून ओळखला जातोय. याच मतदारसंघातून भाजपने २०१४ आणि २०१९ अशा सलग दोन वेळा भाजपचे ‘कमळ’ फुलवले आहे. त्या आधी २००४ ला याच ठिकाणी शिवसेनेचा ‘भगवा’ फडकला होता. अवघे तीन टर्म काँग्रेसनेही आमदारकी चांगलीच गाजविली होती.यंदा तिसऱ्या टर्मसाठी पुन्हा महायुतीकडून विद्यमान आमदार ‘संजीवरेडी बोदकुरवार’ हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. तर महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने याच ठिकाणी ‘संजय देरकर’ यांच्यावर विश्वास टाकत उमेदवारी दिली आहे. दुसऱ्या बाजूला मनसेने देखील राजु उंबरकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उभ केले आहे. तसेच यंदा कोंग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय खाडे यांनी पक्षाशी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवार म्हणुन अन्य पक्षाला आव्हान केलें.तसेच समाजाची धुरा सांभाळणारे तडफडार वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजु निमसटकर हे आहेत परंतु या ठिकाणी चौरंगी लढत म्हणून चारही उमेदवारांनी मतदारसंघात चांगलाच प्रचार केल्याचं दिसून आले. या चारही उमेदवारांसाठी अनेक वरिष्ठ नेत्यांच्या सभा देखील मतदार संघात पार पडल्या. त्यामुळे या लढतीत आता कोण बाजी मारणार ? त्याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
•कोण मारणार बाजी ?
“दरम्यान, बोदकुवार यांनी मागील पाच वर्ष मतदारसंघात अनेक विकास कामे केली आहेत. याच वेळी त्यांनी मतदारसंघातील घरोघरी पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. यातच त्यांनी मतदारसंघाची बांधणी देखील व्यवस्थितरित्या पूर्ण केली आहे. दुसऱ्या बाजूला राजू उंबरकर, संजय देरकर हे देखील मागील काही काळ मतदारसंघात चांगले सक्रिय असल्याचे दिसून आले. त्यासोबतच संजय खाडे हे देखील यांनी देखील प्रचारात आपला जोर चांगलाच लावलाय. त्यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारणार ? ते पाहणं आता महत्त्वाचा ठरणार आहे.”