Monday, May 4, 2026
HomeBreaking Newsवणीत 22 ऑगस्ट ला "लखबीर सिंह लक्खा"......

वणीत 22 ऑगस्ट ला “लखबीर सिंह लक्खा”……

•"प्यारा सजा हैं तेरा द्वार भवानी..."ने गाण्याने दुमदुमणार शहर.  •21 ऑगस्ट पासून श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्याला सुरुवात.

अजय कंडेवार,वणी: दरवर्षी प्रमाणे वणी शहरात दिनांक 21 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट पर्यंत श्री कृष्ण जन्माष्टमी सोहळा रंगणार आहे. यात विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यकमांसह विविध स्पर्धा व भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हा संपू्र्ण सोहळा श्री विनायक मंगल कार्यालय गणेशपूर रोड व अमृत भवन येथे होणार आहे. तर या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असलेले लखबिरसिंह लक्खा यांची भजन संध्या शासकीय मैदान येथे होणार आहे. श्री कृष्ण जन्माष्टमी समिती वणी द्वारा हा भव्यदिव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. संपूर्ण आठवडाभर चालणा-या विविध कार्यक्रमात वणीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीचे अध्यक्ष ऍड. कुणाल विजय चोरडिया यांनी केले आहे.

मंगळवारी दिनांक 21 ऑगस्ट रोजी ‘जय बोला प्रिय पत्नीची’ या धमाल विनोदी कौटुंबीक नाटकाने या सोहळ्याची सुरुवात होत आहे. श्री विनायक मंगल कार्यालय येथे संध्या 7 वाजता या नाटकाचा प्रयोग होणार आहे. बुधवारी दिनांक 22 ऑगस्ट रोजी संध्या 6.30 वा. पाण्याच्या टाकीजवळील शासकीय मैदान येथे संपूर्ण देशातच नाही तर जगभरात आपल्या जगरात्यासाठी प्रसिद्ध असलेले ‘किजो केसरी के लाल’ फेम गायक लखबीर सिंह लक्खा यांची भजन संध्या होणार आहे.

शुक्रवारी दिनांक 23 ऑगस्ट रोजी संध्या. 6 वा. श्री विनायक मंगल कार्यालय येथे सुप्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन प्रा. महेंद्र गणपुले यांचा हास्य नगरी हा धमाल एकपात्री नाट्य प्रयोग होणार आहे. शनिवारी दिनांक 24 ऑगस्ट रोजी संध्या 6 वा. श्री विनायक मंगल कार्यालय येथे अंकी कौटुंबीक नाटक ‘संध्याछाया’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. तर रविवारी दिनांक 25 ऑगस्ट रोजी सं. 6 वा. अमृत भवन येथे राज्यातील नामवंत कविंचे कवि संमेलन होणार आहे.

•शनिवारी व रविवारी विविध स्पर्धा….

शनिवारी दिनांक 24 ऑगस्ट अमृत भवन येथे दु. 2 वा. बाल कृष्ण दर्शन (कृष्ण व महाभारतातील पात्र) ही वेशभूषा स्पर्धा, दु. 3 वाजता डेकोरेशन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी कृष्ण झुला, कृष्ण मटकी सजावट हा विषय आहे. दु. 4 वा. 1 मिनिट स्पर्धा व हौजी स्पर्धा होणार आहे. तर रविवारी दिनांक 25 ऑगस्ट रोजी अमृत भवन येथे दु. 2 वा. धार्मिक व देशभक्तीवर आधारीत सोलो व गृप डान्स स्पर्धा होणार आहे. तर दु. 3 वा. 1 मिनिट स्पर्धा व हौजी स्पर्धे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व स्पर्धा वर्ष 1 ते 6, वर्ष 7 ते 11 व वर्ष 12 ते 18 अशा तीन वयोगटात होणार आहेत. स्पर्धेतील सहभागासाठी राजू रिंगोले, ख्याती चोरडिया,  विद्या मुथा यांना संपर्क साधता येणार आहे.

सोमवारी दिनांक 26 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा रंगणार आहे. स. 6 वा. श्रीकृष्ण पालखी यात्रा निघणार आहे. ही पालखी चोरडिया निवास ते श्रीकृष्ण मंदीर असा प्रवास करणार आहे. संध्या. 6 वा. अमृत भवन येथे सुंदरकाड पाठ व जाप होणार आहे. यात श्रीकृष्ण लीलांचे नाट्य रुपांतरण सादर केले जाणार आहे. रात्री 10 वा. अमृत भवन येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा होणार आहे. या जन्मोत्सवात अभिषेक व श्रीकृष्ण श्रुंगार, बालगोपाल दर्शन, मटकी फोड इत्यादींचे आयोजन करण्यात आले आहे.

भव्य शोभायात्रेने जन्मोत्सवाची सांगता

मंगळवारी दिनांक 27 ऑगस्ट रोजी स. 11 वा. अमृत भवन येथे गोपाळकाल्याचे आयोजन करण्यात आले आहे. तर दु. 4 वा. अमृत भवन येथून भव्य शोभायात्रा निघणार आहे. या यात्रेत विविध देखावे व वाद्य वृंद पथक प्रमुख आकर्षण राहणार आहे. या सर्व कार्यक्रमात वणीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी असे आवाहन ऍड कुणाल विजय चोरडिया यांनी केले आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page