Wani:- लग्न सोहळ्यासाठी (Marriage) लाखो रुपये खर्च करण्याची पद्धत समाजात रुढ होत असताना दुसरीकडे येत्या 15 फेब्रुवारीला राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे विदर्भ अध्यक्ष संबा वाघमारे यांचा विशेष पुढाकारातून चर्मकार समाजासाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून समाजासमोर एक आदर्श कार्य व समाजाप्रती असणारी निष्ठा यातून दिसणार आहे.
राष्ट्रीय चर्मकार महासंघ च्या वतीने विवाह सोहळ्याचे आयोजन जि. यवतमाळ येथील वणी शहरात दि.१५ फेब्रुवारी २०२५ ला चर्मकार समाजातील युवक युवतीचा सामूहिक विवाह मेळावा आयोजित केला आहे. परंतु त्या आधी इच्छुकांनी आपले नावाची नोंद दि. १५ जानेवारी २०२५ पुर्वी करावी लागणार आहे.या विवाह सोहळ्याला नाव नोंदवण्याचा अंतिम तारीख १५ जानेवारी असणार आहे. त्यामुळे या विवाह सोहळ्याला त्वरीत नाव नोंदविण्यासाठी 99229 56956या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन चर्मकार महासंघ विदर्भ अध्यक्ष संबा वाघमारे यांनी केले. आहे तसेच 99229 56956 क्रमांकांवर बायोडाटा पाठवून कॉल देखील करावे.
•वधू-वर करीता ही असणार व्यवस्था……
1.वधू व वरांच्या लग्ग बसण्याची व्यवस्था,2. वधू व वरांची भव्य वरात (मिरवणूक) व्यवस्था,3. दर्जेदार वाद्य, बँडची व्यवस्था,4.वरांसाठी घोडी किंवा बग्गीची व्यवस्था,5.वधू व वर यांचे कडील पाहुणे मंडळीसाठी भोजन व्यवस्था,6.वधू वरांसाठी राहण्याची उत्तम व्यवस्था.या वरील सर्व व्यवस्था राष्ट्रीय चर्मकार महासंघ वणी द्वारे करण्यात येईल.
“अलिकडच्या काळात सोहळे खर्चिक झाल्याने सामान्य सामान्य स्तरातील लोकांना मुला-मुलींचे लग्न करणे अवघड झाले आहे. मानपान, परंपरा, रितीरिवाज तसेच खर्चिक बाबींमुळे सामुदायिक विवाह सोहळ्यांकडे (Community Marriage Ceremony) कल वाढत आहे. विशेषतः आर्थिक स्तर सामान्य ,गरीब व होतकरू असलेल्या विवाह वधू- वराकडील व्यक्तींची भोजनाची व्यवस्था करण्यात येईल. त्या-त्या दाम्पत्याच्या धार्मिक पद्धतीने हे विवाह लावून देण्यात येणार आहेत. तसेच वधू-वरांसाठी पोशाख मंगळसूत्र आणि धार्मिक विधी साहित्य मोफत देण्यात येणार आहे. विशेषतः हा घेण्यात येणारा हा राष्ट्रीय चर्मकार महासंघ वणीद्वारे दुसरे वर्ष असून मागील वर्षी अश्याच सामूहिक विवाह सोहळ्याला भरभरून प्रतिसाद होता यंदाही अनेक जोडप्यांनी सहभाग दर्शवावा.” – संबा वाकूजी वाघमारे.(चर्मकार महासंघ विदर्भ अध्यक्ष)