Ajay Kandewar,Wani:-महाविकास आघाडीच्या वणी शहरातील आजी-माजी पदाधिकारी ,नगरसेवक ,कार्यकर्ते यांनी 14 नोव्हेंबर 2024 रोज गुरुवारी सकाळी ११ वाजता साई मंदिराजवळील संजय भाऊ देरकर यांच्या प्रचार कार्यालयापासुन संजय देरकर यांचे प्रचाराकरिता पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. टिळक चौक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – टागोर चौक- सर्वोदय चौक – गाडगेबाबा चौक -तुटी कमान- मोमीनपुरा -अमृतभवन – शाम टॉकीज – गांधी चौक – खाती चौक – टिळक चौक – लोकमान्य टिळक कॉलेज जवळील कार्यालयात समारोप करण्यात आले. सकाळी 8 वाजता वागदरा (नवीन) येथून प्रचाराला सुरुवात झाली. गावात पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर जुना वाघदरा या गावात प्रचार ताफा पोहोचला. हा गाव शिवसेनेचा गड असल्याने येथे भव्य पदयात्रा निघाली. गावचे माजी सरपंच महेश वैद्य यांच्या घरी संजय देरकर यांनी भेट दिली. त्यांच्या घरी संजय देरकर यांचे औक्षण करून शुभेच्छा दिल्या. संपूर्ण गावात पदयात्रा काढण्यात आली.
त्यानंतर लालगुडा या गावात प्रचार ताफा पोहोचला. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण लालगुडा या गावात प्रचाराला सुरवात झाली. यावेळी देरकर यांनी बौद्ध विहाराला भेट दिली. संपूर्ण गावात ढोल ताशांचा गजरात पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत महिलांची संख्या अधिक होती. त्यानंतर चिखलगाव येथे प्रचार ताफा पोहोचला. गावाच्या मुख्य चौकात असलेल्या गाडगे महाराजांच्या पुतळ्याला पूजन व माल्यार्पण करून गावात प्रचाराला सुरवात झाली. पदयात्रेत ठिकठिकाणी नागरिकांनी संजय देरकर यांचे हार टाकून स्वागत केले.गांधी चौकात संजय देरकर यांनी सर्व व्यापाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रॅली पोहोचली. इथे छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर एकता नगर पासून वळसा घेऊन रॅली तहसील चौकात आली. साई मंदिर येथील प्रचार कार्यालयात रॅलीची सांगता झाली.
रॅलीत माजी आमदार वामनराव कासावार, डॉ. महेंद्र लोढा, घनश्याम पावडे, आशिष खुलसंगे, टिकाराम कोंगरे, राकेश खुराणा, ओम ठाकूर, संजय निखाडे, सुनील कातकडे, कॉम्रेड दिलीप परचाके, कुमार मोहरमपुरी, राजू तुराणकर, प्रवीण खानझोडे यांच्यासह शिवसेना व महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

