•”सारे जहा से अच्छा, हिंदूस्ता हमारा” देशभक्तीचा गजर ही आकर्षणाची बाब.
अजय कंडेवार,वणी:- प्रेषित मोहमद् पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त मुस्लिम बांधवांनी वणी येथे दि.28 सप्टें.गुरुवार रोजी भव्य मिरवणूक काढली. शहराच्या प्रमुख मार्गावरुन फिरुन ही मिरवणूक काढण्यात आली. यात शहरातील शेकडो मुस्लिम बांधवांनी मोठ्या आनंदाने सहभाग घेतला.श्री.गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘जश्न- ए- ईद मिलादूनबी’मिरवणूक दिवसा काढून दुपारपर्यंत समारोप करण्यात आला.या मिरवणुकीत ‘नबी का दामन नही छोडेंगे, व सारे जहा से अच्छा, हिदुस्ता हमारा”अशा घोषणा गाण्याचा माध्यमातून देण्यात आल्या.
वणी येथे मुस्लिम बांधवांनी शिस्तबद्ध मिरवणूक काढली. या प्रसंगी इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत महंमद पैगंबर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काही वचने म्हणण्यात आली.प्रेषित मोहंमद पैगंबर यांनी जगाला दिलेली शांती आणि मानवतेची शिकवण समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावी हा यामागील उद्देश असल्याचे यावेळी तकरीर मधून धर्म गुरूंनी सांगितले. ईद-ए-मिलाद निमित्त आयोजित जुलुस अत्यंत उत्साहात व शांततेत पार पडला.देशात शांतता, सद्भाव व परस्पर धर्मात आपसी भाईचारा वृध्दिंगत व्हावा. यासाठी सामुहिक दुवा ही झाली.यावेळी वणी पोलिस प्रशासनाने अत्यंत चोख बंदोबस्त ठेवला होता. अतिशय व्यवस्थित पोलिस प्रशासनाचा बंदोबस्त यावर्षी दिसून आला. दिपक चौपाटी येथे Dysp गणेश किंद्रे व PI अजित जाधव हे पोलिस अधिकारी ऑन फील्ड वर उपस्थित असतांना वणी मुस्लिम बांधवांची हिंदू- मुस्लिम एकतेचा संदेश देणारी रॅली त्यांनीही पहिल्यांदाच अनुभवली हेही त्यांच्याकरीता विशेष आकर्षणाची बाबच होती असे म्हणायला काहीच हरकत नाही.या प्रसंगी त्या अधिकाऱ्यांनी समाज बांधवांशी संवादही साधला.
मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जाणारा ईद-ए- मिलाद-उन-नबी उत्सव गणेश विसर्जन तसेच पोलिसांवर पडणारा ताण पाहून वेळेची योग्य सांगड घालत मुस्लिम बांधवांनी मोठ्या आनंदात साजरा केला.यावेळी बहुसंख्येने सर्व समाज बांधव उपस्थित होते.