Thursday, March 5, 2026
Homeवणीवणीत गुन्हेशाखेने तंबाखू तस्कराला पकडले....!

वणीत गुन्हेशाखेने तंबाखू तस्कराला पकडले….!

• महादेव नगरी प्रकरणातील तपास संथ गतीने का? काही सुगावा लागणार का गाडी कुणाची पण त्यात मुख्य आरोपी कोण?

अजय कंडेवार,वणी:- वणी उपविभागात सुगंधित तंबाखुची विक्री खुप मोठ्या प्रमाणात होत असल्याने एलसीबीने कारवायांचा धडाकाच लावला. त्यात दिनांक 30 जाने.सोमवारी रात्री कार्यवाही करून या प्रकरणात एकूण 7 लाखांचा वर मुद्देमालासह जप्त करण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की,सुगंधीत तंबाखू व गुटखा घेवुन लालपुलिया मार्गे वणी शहरात दाखल होणार आहे अशी विश्वसनिय माहिती मिळताच LCB ने चिखलगांव वणी येथे रोडवर रात्रीपासून कडक बंदोबस्त लावून असताना सिल्वर  कार क्रमांक एम.एच.३४. ए. ए. ७७६६ या चालकास थांबविले व त्याचे नांव पत्ता विचारला असता अब्दुल नदीम अब्दुल मोबीन वय ३० वर्षे, रा. साई नगरी वणी ता. वणी जि. यवतमाळ सांगीतले. लगेच त्याची  झडती घेतली असता १) मजा १०८ हुक्का शिशा सुगंधीत तंबाखूचे २०० ग्राम क्षमतेचे १६० नग. २) क्रेझ सुगंधीत तंबाखुचे ४५० ग्राम क्षमतेचे २२ नग, असा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधीत तंबाखू व आरोपीचे अंगझडतीत ०१ मोबाईल मिळून आल्याने सदर मुद्देमाल व मुददेमाल वाहून आणन्याकरीता वापरात आणलेले वाहन असा एकूण ७,६२,३००/- रुपये किमतीचा मुददेमाल व आरोपी अब्दुल नदीम अब्दुल मोबीन वय ३० वर्षे, रा. साई नगरी वणी ता. वणी जि. यवतमाळ यास ताब्यात घेवून अन्न सुरक्षा अधिकारी यवतमाळ यांना सदर बाबतीत मागीती देवून पाचारण केले. दिनांक ३१/०१/२०२३ रोजी अन्न सुरक्षा अधिकारी घनश्याम दंदे अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यवतमाळ यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन आरोपीविरुध्द पो.स्टे वणी येथे भादंवि तसेच अन्न सुरक्षा मानके कायदा २००६, नियम व नियमणे २०११ चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ.पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुश जगताप,प्रदीप परदेशी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सपोनि अमोल मुडे, उल्हास कुरकुटे, सुनिल खंडागळे, सुधीर पिदुरकर, सुधीर पांडे, सतिष फुके सर्व स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page