Tuesday, July 15, 2025
Homeमारेगाववणीतील " या...." डॉक्टरने क्षयरुग्णाला घेतले दत्तक‎..!

वणीतील ” या….” डॉक्टरने क्षयरुग्णाला घेतले दत्तक‎..!

•6 महिने पोषण आहार पुरवणार

अजय कंडेवार,वणी:- कम्युनिटी सपोर्ट टु टिबी पेशन्ट उपक्रमाअंतर्गत क्षयरोगमुक्त भारत करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून समाजाचाही सहभाग वाढावा या हेतूने वणी येथील माजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र लोढा यांनी स्वतः पुढाकार घेऊन क्षयरुग्णाला दत्तक घेवून 6 महिन्यांपर्यंतचे अन्नधान्य, तसेच इतर मदत स्वखर्चातून करण्याचे निश्चय केले आहे.Wani’s “This. .” A doctor adopted a tuberculosis patient..! Will provide nutrition for 6 months

कम्युनिटी सपोर्ट टु टिबी पेशन्ट उपक्रमा अंतर्गत डॉ.महेंद्र लोढा यांनी एक टिबी रुग्ण दत्तक घेतले. या रुग्णाला 6 महिने पोषण आहार डॉ.लोढा तर्फे देणार आहे. या रुग्णाला दत्तक घेवून समाजासमोर आदर्श निर्माण केला. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजना अंतर्गत 2025 पर्यंत क्षयरोग मुक्तभारत उद्देश निश्चित केला. या अनुषंगाने हा कार्यक्रम राबविला आहे. या उपक्रमाअंतर्गत क्षयरोग दुरीकरणाचे काम सुरु आहे. हे उद्दीष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने सामाजातील विविध स्तरावर काम करणाऱ्या संस्था, संघटना, व्यक्ती यांच्या सोबत समन्वय साधण्याची आवश्यकता आहे. क्षयरोगाला मुळापासून नष्ट करण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे तसेच समाजाचे योगदानही तेव्हढेच आवश्यक आहे. यासाठीच हा कम्युनिटी सपोर्ट टु टिबी पेशंट हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत टीबी रुग्णांचे उपचार यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी उपचाराखालील रुग्णास अतिरिक्त मदत प्रदान करणे, त्यांना पोषण आहार पुरवणे असा आहे.येणाऱ्या 6 महिन्यात नियमित पौष्टिक‎ आहाराचे वितरण त्यांच्या माध्यमातून‎ करण्यात येणार आहे. असेही डॉ. लोढा यांनी बोलतांना सांगीतले .

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज कुलकर्णी यांनी केले .हा कार्यक्रम आयोजन विजय पाटील धोंडगे (तालुका क्षयरोग पर्यवेक्षक) यांनी केले तसेच या कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी डॉ निलेश चौधरी, डॉ.निमजे, डॉ.सुनिल कुमार जुमनाके तसेच लोढा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मधील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments