Ajay Kandewar, Wani : वणी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ मध्ये सौ. धम्मदिन हरीश पाते यांचे नाव सध्या जोरदार चर्चेत आहे. परिसरातील जनसंपर्क मोहिमेमुळे त्यांच्या पाठिशी पोषक वातावरण निर्माण होत असून मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
धम्मदिन पाते यांचे पती हरीश पाते हे प्रभागातील सर्वसामान्यांमध्ये ओळखले जाणारे, लोकांशी सतत जोडून राहणारे आणि समस्यांवर तत्काळ प्रतिसाद देणारे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या दांडग्या संपर्कजाळ्याचा आणि लोकांमधील विश्वासाचा थेट लाभ धम्मदिन पाते यांच्या उमेदवारीला मिळत आहे. प्रभागातील प्रत्येक गल्ली-बोळात पाते दाम्पत्यांचा संपर्क वाढत असून प्रचार दिवसेंदिवस जोम धरत आहे.धम्मदिन पाते यांनी सुरुवातीपासूनच महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि वंचित घटक यांच्याशी सातत्याने संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आहेत. त्यांची नम्रता, सौजन्यशील वागणूक आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळे मतदारांमध्ये सकारात्मक हवा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.प्रचाराला अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी प्रचारी मुसंडी मारली असून घरोघरी जाऊन धम्मदिन पाते यांचे मुद्देसूद आश्वासने लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू आहे. महत्त्वाच्या बाबींवर काम करण्याचा त्यांचा संकल्प मतदारांना भावतो आहे.प्रभाग ६ मध्ये धम्मदिन पाते यांच्या नावाचा दणदणीत डंका वाजत असून आगामी नगर परिषद निवडणुकीत त्यांचा प्रचारचक्र वेगाने फिरताना दिसत आहे. मतदारांमध्ये तयार झालेली सकारात्मक लाट ही निवडणूक लढतीला नवे वळण देणारी ठरू शकते, असे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

@प्रमुख भूमिकांमध्ये
• प्रभागाचा स्वच्छता व पाणीपुरवठा प्रश्न सोडवणे
• महिलांसाठी स्वावलंबन योजना
• युवकांसाठी क्रीडा व करिअर मार्गदर्शन उपक्रम
• ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने सुविधा

