Tuesday, February 17, 2026
HomeBreaking Newsवणीच्या राजकारणात अखेर भूकंप ...चोरडिया घराण्यातून ‘त्रिकूट राजकारण’ची धमाकेदार एन्ट्री..

वणीच्या राजकारणात अखेर भूकंप …चोरडिया घराण्यातून ‘त्रिकूट राजकारण’ची धमाकेदार एन्ट्री..

Ajay Kandewar, वणी :- वणीतील राजकारण पुन्हा एकदा धडकी भरवणाऱ्या वळणावर आलं आहे! दोन महिन्यांपूर्वी विदर्भ न्यूजने केलेले भाकित आज अक्षरशः सत्य ठरल. कारण, वणी शहरात आणि तालुक्यात मोठा राजकीय भूकंप घडला असून, शेकडो कार्यकर्त्यांचा गट आता थेट शिवसेना (शिंदे गट)दाखल होण्याच्या तयारीत आहे.

या संपूर्ण घडामोडींचं केंद्रबिंदू ठरलेत सामाजिक कार्यकर्ते विजय चौडिया — ज्यांचे नाव वणीतील जनतेत अत्यंत लोकप्रिय आणि विश्वासार्ह म्हणून घेतले जाते. समाजकारणातून सुरू झालेली त्यांची वाटचाल आता थेट सत्तेच्या राजकारणाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. विजय चोरडिया यांच्या मागे असलेला भक्कम जनसमर्थन गट सुद्धा आता शिंदे गटात जाण्याची तयारी करत आहे, अशी माहिती राजकीय वर्तुळात जोरात चर्चेत आहे.पण या प्रकरणात खरा ट्विस्ट आहे — कारण अँड.विजय चोरडिया यांचा मुलगा अॅड. कुणाल चोरडिया हे सध्या भाजपाचा महत्त्वाचा पदाधिकारी आहे, तर त्यांचे जवळचे सहकारी उमेश पोद्दार हे सध्या उभाटा गटाशी निगडीत आणि ठाकरे गटाशी विचारसरणीने जवळीक असलेले कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.

एकाच घरातून तीन पक्ष चालणार…

विजय चोरडिया : शिवसेना (शिंदे गट),अॅड. कुणाल चोरडिया : भाजप, साथीदार उमेश पोद्दार : शिवसेना (ठाकरे गट)अशी ‘त्रिकूट राजकारणाची’ अनोखी रचना तयार होताना दिसत आहे.

या त्रिकूट समीकरणामुळे वणीच्या आगामी निवडणुकीत मोठी राजकीय हलचल निर्माण झाली असून,एका घरातून तीन पक्षांची तिरंगी राजकारण होणार का? हा प्रश्न आता सर्व राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.येत्या निवडणुकीत विजय चौडिया यांचा प्रभाव, त्यांच्या समाजकार्याची मजबूत पार्श्वभूमी, आणि त्यांच्याशी निष्ठावान असलेल्या कार्यकर्त्यांची फळी हे सर्व घटक शिंदे गटासाठी ‘गेम चेंजर’ ठरू शकतात, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.दरम्यान, उमेश पोद्दार उभाटा गटाशी राहणार की नव्या समीकरणाकडे वळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्यांचा निर्णय हा आगामी निवडणुकीच्या राजकीय गणितात निर्णायक ठरू शकतो.वणीतील राजकारणात चौडिया घराण्याच्या तिहेरी समीकरणामुळे भूकंप घडलेला आहे. या राजकीय नाट्याचा पुढचा अंक कधी उलगडतो, हे पाहणे आता वणीकरांसाठी तितकंच रोचक ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments