Thursday, March 5, 2026
HomeBreaking Newsवणीचा रेतीतस्करीत "खादाडांना"अघोषित हप्ता संस्कृती.....?

वणीचा रेतीतस्करीत “खादाडांना”अघोषित हप्ता संस्कृती…..?

•यंत्रणेतील "खादाड "मूळे शासन महसूलचा "सत्यानाश"  •"विवेकबुध्दी"मस्त चमकोगिरित येण्याचा प्रयत्न."कहे पाप धुल जायेंगे...."

Ajay Kandewar,Wani:- तालुक्यातीलच नव्हे तर प्रत्येक रेतीघाट कोणत्यातरी मातब्बर रेतीतस्करांच्या दावणीला बांधलेला आहे. या रेतीतस्करांचे असंख्य ट्रक, ट्रॅक्टर, टिप्पर इतकेच नव्हेतर जेसीबी त्या-त्या रेतीघाटांमध्ये सक्रिय आहेत. यंत्रणेतील प्रती वाहनानुसार हप्त्याचे दर ठरले आहे. त्यात महिन्यातून किती वाहनावर कारवाई करायची याचेही नियोजन आहे. असते अशीही खमंग चर्चा आहे.एकंदरीत या हप्ता संस्कृतीतून “काहीं अधिकाऱ्यांनी” मोठी अपसंपदा गोळा केली आहे.

 

एकंदरीत शासकीय यंत्रणेचा आशीर्वाद आहे की काय? अशी शंका व्यक्त केली जात आहे. महसूल विभागाने अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर दक्षता समिती गठित असते . ती समिती तर सध्या निद्रेत असताना दिसते.कारण एवढ्या लोकांची नियंत्रणा ठेवण्यासाठी दक्षता समिती गठित असूनसुद्धा समिती सदस्यांच्या आशीर्वादाने चोरट्याने मार्गाने रेती व्यवसाय सुरू आहे. या सर्व प्रकरणात अधिकारी व लोकप्रतिनिधी या कामात गुंतले असल्याने कारवाई नेमकी करायची कोणावर? असा प्रश्न निर्माण झाला आहे. रेती माफियांवर कारवाई सोडुन फक्त थातूरमातूर दंड केल्यानेच अवैघ रेतीचा उपसा थांबता थांबेना. यांचे मुख्य कारण गाडी मालक ( खनिज संपत्ती चोर)  याकडे वणी महसूल विभाग कोणतीच कारवाई करतांना दिसत नाही या गोंधळ कारभाराकडे यवतमाळ जिल्हाधिकारी लक्ष देणार काय? असा सवाल नागरिकांना पडला आहे.

• निर्भयपणे काळाबाजार..

वर्धानदीतुन वरोरा या मार्गाने अवैधरित्या रेतीची वाहतूक केली जात आहे. त्यात “काहीना चिरीमिरी देत “निर्भयपणे रेतीचा काळाबाजार सद्य:स्थितीत सुरू आहे. रेती तस्करांना स्थानिक दलाल व महसूल अधिकारी, कर्मचारी, राजकीय पुढाऱ्यांचे पाठबळ असल्याचे चौरस्त्यावर, पानटपरीवर चर्चा नेहमीच रंगतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page