अजय कंडेवार,वणी:- सर्वप्रथमतः मविआचे “उमेदवार” घेऊन आलो पण “आमदार” घेऊन जाणार या उद्गाराने उद्धव ठाकरें यांनी जनेतला साथ मागत म्हणाले कि,वणीचा उमेदवार मला मशालीचाच पाहिजे. त्यानंतर ठाकरेची तोफ थेट पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात फिरत आहेत. इथे महाराष्ट्रात येऊन शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर बोलण्याऐवजी ते काश्मीरमधील अनुच्छेद ३७० बद्दल बोलतात. माझ्यावर टीका करताना, आम्ही अनुच्छेद ३७० रद्द करण्याला विरोध करणाऱ्यांच्या बरोबर आहोत, असे ते म्हणतात. कदाचित अमित शाह यांना स्मृतीभ्रंश झाला असावा, कारण ज्यावेळी कलम ३७० रद्द झाले, त्या निर्णयाला आम्ही समर्थन दिले होते, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
दरम्यान, महाराष्ट्रातील तरुण रोजगार मागत आहेत. शेतकरी हमीभाव मागतो आहे. मात्र, भाजपा त्यांना काश्मीरमधील ३७० रद्द केल्याचे आणि राम मंदिर बांधल्याचे सांगत आहे. राज्यातील मुलभूत प्रश्नांवर भाजपा बोलत नाही तसेच कुणबी समजाबध्दल अपशब्द बोलणाऱ्याना आपण मतदान करणार का असा सवाल उद्धव ठाकरेंनी जनतेला उपस्थित केला.
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वणी येथे भव्य जाहीर सभा संपन्न झाली. महाविकास आघाडीतील उबाठा पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ उध्दव ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यावर असताना वणी येथे सोमवार दि ११ रोजी शासकीय मैदान पाण्याची टाकी येथे सभा पार पडली. यावेळी वणी विधानसभा मतदारसंघातील लोटलेला जनसमुदाय परिवर्तनाची दिशा सांगणारा होता.याप्रसंगी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,माकप, किसान सभा इत्यादी पक्ष व संघटनेचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन समीर लेंनगुडे यांनी केलें.उ
•उद्धव ठाकरे व मिलिंद नार्वेकरांच्या बॅगांची तपासणी.
“जेव्हा उध्दव ठाकरे व मिलिंद नार्वेकर हेलिकॉप्टरने वणीत हेलिपॅडवर दाखल झाले तेंव्हा आठ, दहा अधिकारी मोक्यावर उपस्थित होते.तेव्हा उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की काय करायचं आहे. ते म्हणाले, बॅग तपासायची आहे, उध्दव ठाकरे म्हणाले, “तपासा पण मोदी, शाह शिंदे व फडणवीस यांची देखिल तपासाल का? असा सवाल देखिल उपस्थित अधिकाऱ्यांना केला.”त्यांचा हा व्हिडिओ प्रसार माध्यमात व्हायरल होत आहे.”