Ajay kandewar,Wani:- लाठी लालगुडा सर्कल परिसरात शिवसेनेची मशाल तेजाने प्रज्वलित होत आहे. आ. संजय देरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात इतर पक्षांत कार्यरत असलेले अनेक मान्यवर व कार्यकर्ते शिवसेना (उबाठा) मध्ये दाखल झाले.
या प्रवेशामुळे राजकीय समीकरणात नवे वळण आले असून, वणीसह आसपासच्या भागात उबाठा गटाचे बळ झपाट्याने वाढत आहे.आजवर वणी हा “स्थिर मतदारसंघ” समजल्या जाणाऱ्या वणी-भालर परिसरात आता राजकीय घरबदलाची लाट उसळल्याचे चित्र आहे. कालपर्यंत इतर पक्षांच्या झेंड्याखाली घोषणाबाजी करणारे चेहरे आता उभाठा गटाच्या मशालीखाली उभे ठाकले आहेत. यावरून स्पष्ट होते की, स्थानिक पातळीवर पक्षांची मूळ धरलेली पकड ढासळत चालली आहे.
विविध पक्षांतील गट-तंटे, स्थानिक नेतृत्वाचा अभाव आणि कार्यकर्त्यांचा उपेक्षेचा अनुभव या सगळ्यामुळेच ही पलायनाची वेळ आली आहे. आज कार्यकर्ते एका झेंड्याखालून दुसऱ्या झेंड्याखाली धावत आहेत म्हणजे लोकांचा विश्वास कमी झाला, की नेतृत्वाची पकडच सैल झाली – हा प्रश्न इतर पक्षांना छळतोय.आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वावर युवकांचा आणि जनतेचा प्रचंड विश्वास निर्माण झाल्यानेच ही मोठ्या प्रमाणातील इनकमिंग लाट दिसतेय. “शिवसेना ही सामान्य माणसाच्या आशा-आकांक्षांची मशाल आहे,” असे सांगत आमदारांनी नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत केले.भालरचे: गोविंदा आत्राम, शंकर जेऊरकर, शंकर पेंदाने, ग्रामपंचायत सदस्य किशोर लखमापूरे, प्रमोद देठे बोरगाव (अहेरी) : सुमित कळसकर, तन्मय बल्की लालगुडाचे: आबा बांगडे, कौसर अली सय्यद, विलास उमाटे, राजु कामटकर, सादिक पठाण, चंदू बोरपे, संजू घरकुडे प्रत्येकाने जुने राजकीय रंग सोडून उबाठा गटात प्रवेश केला आहे.आगामी निवडणुका लक्षात घेता, हे प्रवेश फक्त संख्या वाढवणारे नाहीत, तर विरोधी पक्षांच्या गोटात “कंबरडे मोडणारे” आहेत. त्यामुळे उबाठा गट आता केवळ अस्तित्वात नाही तर सत्ता समीकरणात निर्णायक ठरण्याची क्षमता दाखवतो आहे.

