•3500 जनावरांना लसीकरण…..
देव येवले ,(झरी तालुका प्रतिनिधी): तालुक्यात जनावरांना लम्पी स्किन या रोगाचा प्रभाव दिसत आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील महिन्यापासून लम्पी स्किन या संसर्गजन्य आजाराने राज्याला हैराण करून सोडले आहे. लम्पी आजार झालेल्या जनावरांच्या अंगावर जागोजागी फोड उठणे, जनावरांच्या चारा खाण्यावर परिणाम होणे व अशक्तपणा वाढणे ही लक्षणे जनावरांमध्ये दिसत आहेत. या आजारावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी तालुक्यातील पशु वैद्यकीय यंत्रणा कामाला लागली असून, ग्रामपातळीवर जनजागृती व लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे.
मुकुटबन आणि देमाडदेवी या दोन केंद्रातील पाच बाधित जनावरे आढळून आल्याने पशु पालक धास्तावले आहे. या जनावराचे नमुने चाचणीसाठी पाठविले आहे. असून त्याचे रिपोर्ट अजून प्राप्त व्हायचे आहे. या दोन्ही केंद्र अंतर्गत अडेगाव वगळता ५ किलोमीटर पर्यंतच्या साडे तीन हजार जनावरांना लसीकरण पूर्ण झाले आहे. गाव पातळीवर सबंधित डॉक्टरची टीम गावांना भेटी देऊन संबंधित ग्रामपंचायतीला तात्काळ गावातील सर्व गोठे, साचलेली डबकी, निरोगी जनावरे यांची फवारणी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. या पार्श्वभूमीवर या रोगाबाबत दक्षता घेताना बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवावीत, कोणत्याही संभाव्य रोगी जनावरास निरोगी जनावरांच्या कळपात प्रवेशास बंदी घालावी, रोग प्रादूर्भाव झालेल्या गावातील बाधित व निरोगी जनावरांना चरावू कुरणांमध्ये एकत्रित सोडण्यास मनाई करावी, डास, गोचिड व तत्सम किड्यांचा बंदोबस्त करावा, तसेच, निरोगी जनावरांच्या अंगावर किडे न चावण्यासाठी औषध लावावे व गोठ्यांमध्ये यासाठीच्या औषधांची फवारणी करावी, रोग प्रादूर्भाव क्षेत्रातील जनावरांना रोग प्रादूर्भाव नसलेल्या ठिकाणी तसेच स्थानिक बाजारांमध्ये नेण्यास प्रतिबंध करावा, त्याचप्रमाणे या आजाराच्या लक्षणांनी ग्रासित जनावर दिसून आल्यास त्वरीत नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून त्या जनावरावर उपचार करून घ्यावेत. त्वचेवरील गाठीचे जखमेत रुपांतर झाल्यास जखमेत जंतू पडू नये, यासाठी जखमेवर नियमित औषध, मलम लावावे. त्याचप्रमाणे पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार लसीकरण करून घ्यावे. बैठकीमध्ये लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव, यावर सर्व अनुषंगिक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करून, उपाय योजना व जनजागृती करताना पशु वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी दिसत आहे.
“विदर्भ न्यूज” प्रतींनीधिने घेतलेली मुलाखत,
- “(आजार अत्यंत संसर्गजन्य असल्यामुळे लम्पी स्किन डिसीज सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीयांना तातडीने संपर्क साधावा. निरोगी जनावरांना बाधित जनावरापासून वेगळे बांधावे, गाई आणि म्हशी एकत्र बांधू नयेत, योग्य त्या जैवसुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी, बाधित जनावरांचे तत्काळ व योग्य औषधोपचार केले आणि अबाधित क्षेत्रात १०० टक्के लसीकरण केले तर या रोगाचे प्रभावीपणे नियंत्रण करता येते.)”–डॉ. बालाजी जाधव,पशु वैद्यकीय अधिकारी, झरी