•आरोपींकडून आणखी काही नावे व गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता.
नागेश रायपूरे,मारेगाव :- रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून डॉक्टर पोभास रवींद्रनाथ हाजरा(45) हे प्रॅक्टिस करून येत असताना पैसे व दागिने घेऊन पसार झालेल्या दरोडेखोरांना L.C.B पथक यवतमाळ, मारेगाव पोलिस व अदिलाबाद पोलिसांच्या अथक परिश्रमाने आरोपींना अदिलाबाद येथे अटक करण्यात आली.The gang that kidnapped and robbed the doctor at the point of revolver is finally in the custody of the police
सविस्तर वृत्त असे कि,पोभास रवींद्रनाथ हाजरा (45) प्रभाग क्र.5 मंगलम पार्क मारेगाव असे लुटण्यात आलेल्या खाजगी डॉक्टर चे नाव आहे.फिर्यादी डॉ. हाजरा यांचा तालुक्यातील नवरगाव येथे खाजगी दवाखाना आहे. ते नेहमी प्रमाणे दवाखाना बंद करुन सायंकाळी 7 ते 8 वाजता दरम्यान मारेगाव कडे आपल्या ऍक्टिव्हा ( MH 29 BB 2867) दुचाकी परत येत होते. दरम्यान करंजी वणी राज्य महामार्गावर मारेगाव नजीक नायरा पेट्रोल पंप जवळ नंबर सिरीज नसलेल्या पांढऱ्या रंगाचे शिफ्ट कार (MH 31 6307) अचानक डॉ. हाजरा यांचे दुचाकीला आडवी आली होती .दरम्यान त्या कार मधुन 28 ते 32 वयोगटातील चार अज्ञात इसमा एक कार मध्ये होता तर यापैकी तीन इसम खाली उतरले. एकाने दुचाकी धरली तर एकाने रिव्हॉल्व्हर लावली व तिसऱ्याने जिवे मारण्याची धमकी देत, बळजबरीने डॉ. हाजरा यांना कार मध्ये बसवले होते.
दरम्यान त्या अज्ञात इसमाने रिव्हॉल्व्हर धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देत फिर्यादी जवळील रोख 24 हजार रुपये, 15 हजार रुपये 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व 30 हजार किमतीचा 12 ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोप हिसकावला. चोरटे इथेच न थांबता फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देत चक्क पुन्हा 25 लाख रुपयांची मागणी केली असता. दरम्यान फिर्यादीने वणी येथील एका मित्राला 3 लाख रुपये घेवून बोलविले व एका आटोमोबाईल दुकाना समोर कार चा अर्धा काच खाली करुन आरोपीने 3 लाख रुपये घेतले होते. व दरम्यान फिर्यादीला जीवे मारण्याच्या धमक्या देत कारच्या खाली उतरवून चोरटे पसार झाले होते.दरम्यान फिर्यादी डॉ. हाजरा यांनी मारेगाव पोलिसात धाव घेत घडलेली आपबीती सांगितले मारेगाव पोलिसांनी त्या लुटारुं विरोधात कलम 392, 363, 364, (अ), भांदवी सहकलम 3/25, 4/25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अशा स्वरुपाची गंभीर घटना घडताच शेजारील जिल्हे व तेलंगना राज्यातील आदीलाबाद येथील पोलीस नियंत्रन कक्षांना तात्काळ सतर्क करुन आपआपले परिसरात नाकाबंदी लावण्या बाबत कळविण्यात व स्था. गु.शा. तसंच पो.स्टे. मारेगांव येथील पथके तयार करुन आरोपीतांचं मागावर रवाना करण्यात आले दोन्ही पथकांना अदिलाबाद येथील पोलीसांशी समन्वय साधुन कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या त्यावरुन सदरची पथके अदिलाबाद पोलीसांचे संपकांत असतांना मारेगांव येथील घटनेच्या काही तासातच रात्री दरम्याण अदिलाबाद येथे सुध्दा नमुद आरोपीतांनी मारेगांव सारखीच घटना करण्याचा प्रयत्न केला परंतु यवतमाळ पोलीसांनी अदिलाबाद पोलीसांना सतर्क केले असल्यामुळे अगोदरच अदिलाबाद शहरात नाकाबंदी लावण्यात आल्यामुळे आरोपीतांचा प्रयत्न अयशस्वी झाला व त्यांनी वाहन तेथेच सोडुन पळ काढला त्यातील २ आरोपीतांना पकडण्यात अदिलाबाद पोलीसांना यश आले .वेळीच स्था.गु.शा. यवतमाळ तसेच पो.स्टे. मारेगांव येथील पथक तेथे पोहचुन त्यांनी अदिलाबाद पोलीसांशी समन्वय साधुन माहिती वेळेत पोहचवल्यामुळे त्यातील अधिक ०३ आरोपीतांना झांसी येथुन ताब्यात घेतले आहे.अशा प्रकारे यवतमाळ पोलीसांनी घटना घटताच शेजारील जिल्हे व अदिलाबाद पोलीसांना सतर्क केल्यामुळे तसेच तात्काळ माहितीचे आदानप्रदान व समन्वयातुन २४ तासाचे आत मारेगांव येथील गुन्हयातील आरोपी निष्पन्न केले आहेत. कोर्ट कार्यवाही करुन आरोपीतांना ताब्यात घेवुन पुढील तपास करण्यात येत आहे.The gang that kidnapped and robbed the doctor at the point of revolver is finally in the custody of the police
सदरची कारवाई ही सर्व वरिष्ट अधिकारी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ व मारेगांव पो.स्टे.येथील पथक यांनी अदिलाबाद स्थानिक गुन्हे शाखेशी समन्वय साधुन यशस्वीरित्या पार पाडली.