•25 लाखाची मागितली होती खंडणी, रोख रक्कमे सह सोने लंपास करुन चोरटे पसार
• मारेगावतील घटना, अज्ञात चार चोरट्या विरोधात गुन्हा दाखल.
नागेश रायपुरे, मारेगाव :- दवाखाना बंद करुन आपल्या स्कुटीने घराकडे परत जात असतांना वाटेतच चक्क चार अज्ञात चोरट्यानी रिव्हॉल्व्हरच्या धाकावर एका खाजगी डॉक्टर ला अपहरण करुन सिनेस्टाईल लुटल्याची खळबळजनक घटना मारेगाव नजीक नायरा पेट्रोल पंप जवळ घडली. ऐन रहदारीच्या परिसरात ही मोठी घटना घडल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.At the point of revolver, the doctor was kidnapped and Cinestyle was robbed
पोभास रवींद्रनाथ हाजरा (45) प्रभाग क्र.5 मंगलम पार्क मारेगाव असे लुटण्यात आलेल्या खाजगी डॉक्टर चे नाव आहे.फिर्यादी डॉ. हाजरा यांचा तालुक्यातील नवरगाव येथे खाजगी दवाखाना आहे. ते नेहमी प्रमाणे दवाखाना बंद करुन सायंकाळी 7 ते 8 वाजता दरम्यान मारेगाव कडे आपल्या ऍक्टिव्हा ( MH 29 BB 2867) दुचाकी परत येत होते. दरम्यान करंजी वणी राज्य महामार्गावर मारेगाव नजीक नायरा पेट्रोल पंप जवळ नंबर सिरीज नसलेल्या पांढऱ्या रंगाचे शिफ्ट कार (MH 31 6307) अचानक डॉ. हाजरा यांचे दुचाकीला आडवी आली .दरम्यान त्या कार मधुन 28 ते 32 वयोगटातील चार अज्ञात इसमा एक कार मध्ये होता तर यापैकी तीन इसम खाली उतरले.
एकाने दुचाकी धरली तर एकाने रिव्हॉल्व्हर लावली व तिसऱ्याने जिवेमारण्याची धमकी देत, बळजबरीने डॉ. हाजरा यांना कार मध्ये बसवले.
दरम्यान त्या चार अज्ञात इसमाने रिव्हॉल्व्हर धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देत फिर्यादी जवळील रोख 24 हजार रुपये, 15 हजार रुपये 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व 30 हजार किमतीचा 12 ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोप हिसकावला. चोरटे इथेच न थांबता फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देत चक्क पुन्हा 25 लाख रुपयांची मागणी केली असता. दरम्यान फिर्यादीने वणी येथील एका मित्राला 3 लाख रुपये घेवून बोलविले व एका आटोमोबाईल दुकाना समोर कार चा अर्धा काच खाली करुन आरोपीने 3 लाख रुपये घेतले. व दरम्यान फिर्यादीला जीवे मारण्याच्या धमक्या देत कारच्या खाली उतरवून चोरटे पसार झाले.At the point of revolver, the doctor was kidnapped and Cinestyle was robbed
दरम्यान फिर्यादी डॉ. हाजरा यांनी मारेगाव पोलिसात धाव घेत आपल्या सोबत घडलेली आपबीती सांगितले असता मारेगाव पोलिसांनी त्या 4 अज्ञात चोरट्या विरोधात कलम 392, 363, 364, (अ), भां.द.वी सहकलम 3/25, 4/25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांचे मार्गदर्शनात ठाणेदार राजेश पुरी करत आहे.