•स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सचिता नगराळे व राकाँ पक्षाचे विजय नगराळे यांचा मुलगा.
अजय कंडेवार,वणी: राष्ट्रीयस्तरीय अॅबॅकस स्पर्धा २८ जानेवारी रोजी नागपूर येथे पार पडली. या स्पर्धेत विदर्भातील ५ ते १४ वयोगटातील ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत वणीच्या जिनियस चॅम्प्स अॅकॅडमीचा विद्यार्थी अन्वय नगराळे यांने विदर्भातून प्रथम क्रमांक पटकाविला. आईशा अहमद हिने द्वितीय क्रमांक पटकाविला अन्वय नगराळे हा येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सचिता नगराळे व राकाँ पक्षाचे विजय नगराळे यांचा मुलगा आहे. तो वणीच्या स्वर्णलीला शाळेचा विद्यार्थी आहे