Tuesday, February 17, 2026
HomeBreaking Newsरावण दहनाची प्रथा बंद करा अन्यथा.....!

रावण दहनाची प्रथा बंद करा अन्यथा…..!

•आदिवासी समाजाचा आक्रमक पवित्रा.

चैतन्य कोहळे,माजरी – महात्मा राजा रावण मानवतावादी समृद्ध व वैभवशाली संस्कृतीचे प्रतीक आहे. निसर्गरक्षक, उत्कृष्ट समाज व्यवस्थेचा उद्गाता, समान न्याय देणारा न्यायप्रिय राजा असलेल्या आदिवासींच्या राज्याची षडयंत्रकारी सनातनी व्यवस्थेने परंपरेच्या नावाखाली प्रतारणा चालविली आहे. आदिवासी संस्कृतीचे प्रतीक संवर्धनाऐवजी संपविण्याचा प्रकार होत असून, आदिवासींच्या समूहाचा अवमान थांबविण्यासाठी ‘रावण’ दहन प्रथा कायमची बंद करण्याची मागणी चंद्रपूर जिल्हाधिकारी, चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक , उपविभागीय अधिकारी वरोरा, वेकोलिचे मुख्य महाप्रबंधक, माजरी ठाणेदार यांच्याकडे निवेदनाद्वारे साकडे घातले.

हजारो वर्षांपासून रावण दहनाची प्रथा सुरू आहे. सत्याचा असत्यावर विजय या अर्थाने दरवर्षी दसऱ्याला रावणाच्या प्रतिमेचे दहन केले जाते. मात्र मागील वर्षीपासून आदिवासी समाजाने या प्रथेला विरोध करीत आहे. रावण हा विविध गुणांचा समुच्चय आहे. तो संगीत तज्ञ, राजनीतीज्ञ, उत्कृष्ट शिल्पकार, आयुर्वेदाचार्य, विवेकवादी होता. इतके असताना त्याच्या प्रतिमेचे दहन करून त्याला व त्याच्या गुणांना अपमानित करणे चुकीचे आहे, असे आदिवासी समाजाने म्हटले आहे.

रामायण आणि पुराणांमध्ये कुठेही रावणाचे चरित्र वाईट अर्थाने नोंदविलेले नाही. उलट ज्ञानी, संस्कृत पंडित, बलवान, न्यायी राजा असाच रावणाचा उल्लेख आढळतो. त्यामुळेच देशात काही ठिकाणी रावणाची मंदिरे आहेत व आदिवासी समाज रावणाला आपला मोठा भाऊ मानतो. रावणदहन करणे म्हणजे बहुजन समाजाची भावना दुखावणे आहे. त्यामुळे ही प्रथा तातडीने बंद करावी व रावण दहन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान दशऱ्याच्या दिवशी रावण यांचा पुतळ्याचे दहन करणाऱ्या व्यक्तीवर व मंडळावर भादवि १८६० अंतर्गत कलम १५३, १५३(अ ), २९५, २९५(अ ), २८९ मुंबई पोलिस कायद्यानुसार १३०,१३४,१३५ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आदिवासी समाजाचे संघटक तथा माजी पं. स. सदस्य चिंतामण आत्राम यांच्यासह आदिवासी समाज व अनुसूचित जनजातीच्या विविध संघटनेने निवेदनातून केली आहे.

कोड….

उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी माजरी पोलीस स्टेशन येथे दोन्ही पक्षाची बैठक घेण्यात आली होती. दरम्यान दोन्ही पक्षांनी आप-आपली भूमिका मांडली. दोन्ही पक्ष आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याचे बैठकीत निदर्शनात आले. दरम्यान सोमवारी उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्या दालनात दोन्ही पक्षाची बैठक लावण्यात आली. बैठकीत रावणाच्या पुतळ्याला न जाळता एक मुखी पुतळ्याचा दहन होणार. आणि त्या पुतळ्यामध्ये रावणाचा कुठलाही उल्लेख राहणार नाही असा निर्णय झाला.”- API अजितसिंग देवरे, (ठाणेदार , पो.स्टे.माजरी)

कोड….

रावण दहन समितीकडून मागील तीस वर्षांपासून रावण दहन कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमातून कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणे असा उद्देश नसून, “बुराई पर अच्छाई की जीत” या उद्देशाने पुतळ्याचे दहन करण्यात येत आहे.”- एम. पी. राव (अध्यक्ष -रावण दहन समिती)

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments