● छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानास्पद वक्तव्याचा काँग्रेसने केला निषेध!
अजय कंडेवार,वणी:– डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ औरंगाबाद येथील कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत अवमान करणारे विधान करून जगभरातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहे. त्याच्या निषेधार्थ वणी तालुका काँग्रेसचा वतीने शिवाजीचा पूर्णाकित पुतळ्यासमोर करण्यात आले.
तात्काळ महाराष्ट्र राज्यातून राज्यपाल भगतसिंह कोषारी यांची हाकलण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली.महाराष्ट्रा सारख्या पुरोगामी राज्यांची राज्यपाल या घटनात्मक पदाची धुरा सांभाळत असलेले भगतसिंग कोश्यारी यानी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल यापूर्वी सुध्दा बेताल वक्तव्य व वादग्रस्त व्यक्तव्य करुन महाराष्ट्र राज्यातील तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावण्याचा काम सातत्याने राज्यपाल कोषारी यांच्याकडून होत आहे. तथापी यापूढे कधीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केल्यास म्हणून शिवप्रेमी म्हणून वणी तालुका काँग्रेस कमिटी कडून जसंच्या तसं उत्तर देण्यात येईल. Congress protest भगतसिंग कोश्यारी हे विकृत बुद्धीने वारंवार महापुरुषांचा अवमान करत आहे. त्यामूळे त्यांना या पदावर राहण्याचा कोणताही नैतीक अधिकार नाही. तरी त्यांनी आपला राजीनामा देऊन उत्तराखंडला जावे, असे डॉ.महेंद्र लोढा यांनी बोलून दाखविले.
यावेळी वणी काँग्रेस कमिटीचे डॉ महेंद्र लोढा, प्रमोद निकुरे, आशिष कुलसंगे, शंकर वऱ्हाटे ,राजू कासावार, सविता ठेपाले, पानघाटे, प्रमोद लोणारे, डॅनी संड्रावार हे समस्त उपस्थित होते.