•दहीहंडी महोत्सवात दिलेला शब्द “राजू दादा”नी पाळला- बेरोजगार युवक
•”न भूतो… न भविष्यती” असा हा रोजगार मेळावा.
अजय कंडेवार,वणी:- नुकत्याच 60 दिवसाआधी पार पडलेल्या “दहीहंडी” महोत्सवात मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी वणी मतदारसंघातील ५,००० बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन दिले होते.आश्वासन पूर्णत्वास नेत मनसेकडून हा रोजगार महोत्सव विधानसभा मतदारसंघातील सुशिक्षित व कुशल युवक- युवतींना यशस्वी करिअरची संधी मिळावी, या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून भव्य रोजगार महोत्सव दि.3 डिसें.ला शहरातील S.P.M प्रणांगणात हा रोजगार महोत्सव पार पडला.
मनसे नेते राजू उंबरकर यांच्या हस्ते “ऑन द स्पॉट ” जॉइंनिंग लेटर देताना टिपलेले एक क्षण….
देशातील ८० पेक्षा अधिक उद्योग, सेवा व खासगी क्षेत्रांतील नामवंत कंपन्या या रोजगार महोत्सवात सहभागी झाल्या होत्या. या मेळाव्यास मतदारसंघातील युवक युवतींचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला.या महोत्सवात एकूण १३ हजार ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनें अर्ज नोंदणी झाली होती. तर काल उपस्थितीत अर्जदारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कंपन्यांकडून मुलाखती घेण्यात आल्या तर मुलाखत उत्तीर्ण अर्जदारास तात्काळ नियुक्त पत्र देउन त्यांना कार्यक्षेत्र व कार्यरत दिनांक आणि वेतनाची लिखित माहिती या नियुक्तीपत्रावरच देण्यात आली.युवकांना तात्काळ नियुक्ती पत्र देऊन “ऑन द स्पॉट “नोकरी देण्यात आली.
कंपन्यांच्या प्रतिनिधीकडून घेतलेल्या मुलाखतीत उत्तीर्ण झालेल्या युवक/युवतींना मनसे नेते राजु उंबरकर व मान्यवरांच्या हस्ते नियुक्त पत्र देण्यात आले. बेरोजगारीशी झुंज करून मनसेच्या माध्यमातून मिळालेल्या रोजगारामुळे तरुणांच्या चेहऱ्यावरील हसू उमटून आलें.