•रात्री 9.30 ला होणार अंत्यविधी.
अजय कंडेवार,वणी :- राजूर येथील व्यावसायिक सुनिल नामदेवराव गंधारे वय (46 वर्ष) यांचे आज दिं.8 एप्रिल रोजी नागपूर येथील एका खाजगी इस्पितळात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांचे राहते ठिकाण वणी येथील सदाशिव नगर येथील…. यांचा मृत्यूची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरताच दुःखाच वातावरण निर्माण झाले.Sunil, a businessman from Rajur, passed away..The funeral will be held at 9.30 pm.
त्यांचा जाण्याने मित्र परिवारात एक हरफनमौलाच निघुन गेला की काय अशी अवस्थाही मित्रांमध्ये बोलल्या जात आहे. कारण अत्यंत चांगला स्वभाव, हसतखेळत सर्वांशी राहण्याची आवड असणारा…. जणू काही आपलच तो अशी भावना मनात ठेवणारा हाच तो सुनिल….. आज सर्वाँना सोडुन गेल्याने दुखःद वातावरण पसरले.त्याचा पाठीमागे खूप मोठा परिवार … पत्नी,2 मुले, लहान भाऊ असा आप्त परिवार आहे. त्याचा जाण्याने गंधारे परिवारावर संकटच कोसळले.त्याचा अंत्यविधी आज दिनांक 8 एप्रिल रोजी रात्री 9.30 च्या दरम्यान वणी येथील मोक्षधाम येथे होणार आहे.