अजय कंडेवार,Wani :- तालुक्यातील राजूर प्रा.आ केंद्रांतर्गातील कार्यक्षेत्रात अन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहे. त्यासाठी मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस चव्हाण व जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर तन्वीर शेख यांच्या अध्यक्षतेखाली तालुका आरोग्य अधिकारी समिर थेंरे,प्राथमिक आरोग्य केंद्र राजूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.चिखलीकर,वैद्यकीय अधिकारी आस्वले यांच्या मार्गदर्शनात आरोग्य सहाय्यक किरण तुळजापुरे ,राजेश वाडी यांच्या सुबद्ध नियोजनाने “एकदिवसीय गप्पी मासे सोडण्याचे धडक मोहीम” राबविले. Rajur Primary health Center released “Guppy fish” in the working area within the center.

पावसाळ्याच्या दिवसांत पसरणाऱ्या मलेरिया, टायफाईड डेंग्यू, चिकनगुनिया या साथरोगांवर प्रतिबंध घालण्यासाठी प्रा.आ.केंद्र राजूर कार्यक्षेत्रात पाणीसाठे तसेच गटारींमध्ये गप्पी मासे मोठ्या प्रमाणात सोडण्यात आले.गप्पी मासे सोडल्यामुळे डासांचे निर्मूलन होणार आहे.

या मोहिमेंतर्गत पथकाने घरोघरी जाऊन सांडपाण्याच्या साठ्यात ॲबेटींग केले. तसेच प्रत्येक परिसराची धुरळ्णी करण्यात आली. त्यानंतरच गप्पी मासे सोडण्यात आले.या मोहिमेदरम्यान प्रत्येक गावा-गावात पाणी साचलेल्या डबक्यांमध्ये गप्पी मासे सोडून साथ नियंत्रण “एक दिवसीय धडक” कार्यक्रम हाती घेण्यात आलें व गावात कंटेनर सर्वेक्षण, टेमिफॉस ॲक्टिव्हिटी करण्यात आली.यावेळी आरोग्य सहायिका स्वाती पूनवटकर, आरोग्य सेविका,आरोग्य सेवक, सी.एच.ओ, आशा सेविका व सर्व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.त्यांचा विशेष सहकार्याने ही मोहीम यशस्वीरित्या पार पडली.

