Thursday, August 13, 2026
HomeBreakingराजुर ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच दिव्यांगांना ५ टक्के निधीचे धनादेश वाटप......

राजुर ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच दिव्यांगांना ५ टक्के निधीचे धनादेश वाटप……

Ajay,Wani : शासनाच्या नियमानुसार ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून दिव्यांगांच्या कल्याणासाठी राखीव असलेल्या ५ टक्के निधीचा प्रत्यक्ष लाभ देण्याच्या दिशेने राजुर ग्रामपंचायतीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राजूर ग्रामपंचायत प्रशासक विद्या डेव्हिड पेरकावार आणि ग्रामपंचायत सचिव एस. टी. शेंडे यांच्या पुढाकाराने १२ दिव्यांग लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. राजुर ग्रामपंचायतीच्या उपलब्ध नोंदीनुसार, यापूर्वी दिव्यांगांना या निधीतून अशा प्रकारे धनादेश वाटप झाल्याची नोंद नसल्याने हा निर्णय ग्रामपंचायतीच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

नुकतेच ग्रामपंचायत सचिव म्हणून रुजू झालेल्या एस. टी. शेंडे यांनी दिव्यांगांसाठी राखीव ५ टक्के निधीचा विषय प्राधान्याने हाती घेतला. यासाठी यापूर्वीच जाहीर सूचना प्रसिद्ध करून पात्र दिव्यांग नागरिकांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासून आता प्रत्यक्ष धनादेश वाटपाची प्रक्रिया राबविण्यात आली.या निर्णयामुळे शासनाच्या कल्याणकारी तरतुदीचा लाभ कागदोपत्री न राहता थेट दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न राजुर ग्रामपंचायतीने केला आहे. विशेष म्हणजे, आजवरच्या उपलब्ध नोंदींच्या आधारे राजुर ग्रामपंचायतीत दिव्यांगांसाठी ५ टक्के निधीचा प्रत्यक्ष लाभ देणारे सचिव म्हणून एस. टी. शेंडे यांचे नाव पुढे आले आहे.या वेळी राजुर ग्रामपंचायतीच्या प्रशासक विद्या डेव्हिड पेरकावार, ग्रामपंचायत सचिव एस. टी. शेंडे, ग्रामपंचायत लिपिक व कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.

वंचित दिव्यांगांनी तातडीने संपर्क साधावा…

दरम्यान, अद्याप कोणताही पात्र दिव्यांग लाभार्थी या लाभापासून वंचित राहिला असल्यास त्याने विलंब न करता राजुर ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन सचिव एस. टी. शेंडे यांनी केले आहे. 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page