•4 ही गावांना धान्य किट व ब्लॅकेट चे वाटप.
अजय कंडेवार,वणी :– तालुक्यातील वर्धा नदीकाठावरिल पुरग्रस्त गावातील गरजू लोकांना धान्य किट गहू,तांदुळ, दाळ, साखर, तेल व इतर जिवनावश्यक साहित्य व ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले.
हे वाटप रंगनाथस्वामी अर्बन निधी लि. वणी, व लक्ष्मीनारायण नागरी सह.पतसंस्था मर्या. वणी, तसेच रंगनाथस्वामी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि.वणी यांच्या संयुक्त विद्यमाने वणी तालुक्यातील कोना येथे 71 किट, रांगणा 27 किट,भुरकि -32 किट, व झोला येथे – 20किट या गावातील पुरग्रस्तांना 150 धान्य किट व 150 ब्लॅकेट चे वाटप करण्यात आले. हे वाटप खासदार बाळुभाऊ धानोरकर चंद्रपुर वणी आर्णी लोकसभा क्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्याचे वाटप करण्यात आले.या गावातील पुरग्रस्तांना 150 धान्य किट व 150 ब्लॅकेट चे वाटप करण्यात आले. तसेच इतरही गावाला लवकरात लवकर वाटप करण्यात येईल.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संजय रा. खाडे, संगिता सं. खाडे यांच्या मार्फत पुरग्रस्तांना वाटप करण्यात आले वाटपा प्रसंगी कोना सरपंच रंजना खामणकर उपसरपंच विजय परचाके, झोला सरपंच वैषाली सुर ,उपसरपंच अशोक सुर, भुरकि सरपंच हरिचंद्र बदकि, रांगणा सरपंच प्रकाश बोबडे उपसरपंच दिलीप परचाके, संचालक ईश्वर खाडे संस्थेचे कर्मचारी अनुराग आईतवार अनुज मट, अतुल घाटोळे, वृषभ बोबडे, हितेश कोहाड, व चारहि गावातील पदाधिकारी व पुरग्रस्थ वाटपाप्रसंगी मोठया संख्येनी उपस्थित होते.