•दुपारी घरीच होता पडून पण…..
अजय कंडेवार,वणी :- आत्महत्याचे प्रमाण वाढत असतानाच आता आणखी एका 30 वर्षीय युवकाने विषाचा घोट घेतल्याची घटना तालुक्यातील नेरड (पुरड) येथे दि.4ऑगस्ट ला दुपारी घडली.The youth took a sip of poison..Afternoon was lying at home but…..
शंकर मनोहर धावंडे वय (30) रा. नेरड(पुरड) असे मृतक युवकाचे नाव आहे. मृतक शंकर हा कुटुंबाचा आधार होता. दि 4 ऑगस्ट रोजी शुक्रवारी दुपारचा सुमारास घरी कुणीही नसल्याची संधी पाहत शंकरने विषारी औषध प्राशन केले व तो घरीच पडलेल्या अवस्थेत होता. जेव्हा घरच्यांना कळले तेव्हा त्याला तात्काळ वणी येथील शासकिय रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. शंकरने आत्महत्या का केली ? याचे कारण अद्यापही कळू शकले नाही.
त्याच्या कुटुंबात त्याचा निघून जाण्याने धक्काच बसला आहे.गावात सर्वत्र दुःखाच सावट पसरले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.