Thursday, May 15, 2025
Homeवणी"या...."PHC मध्ये डॉक्टर व कर्मचार्‍यांमधील माणूसपण...!

“या….”PHC मध्ये डॉक्टर व कर्मचार्‍यांमधील माणूसपण…!

कायर प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांना “प्रसूतीसाठी” ठरताहेत वरदान.

•कर्मचाऱ्यांची कमतरता तरीही सोय माञ पूर्ण….

अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील नकाशावरील अतिशय आड असलेले एक कायर गाव कदाचित शोधायला अवघड जाईल. इतकेच काय, प्रत्यक्ष शोध घ्यायला निघालो तरी त्या रस्त्यावर जंगल परिसर ह्यामुळे नकोसेच होईल.पण ह्या गावात एक “शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र”आहे आणि तेथे त्या गावासोबतच आजूबाजूच्या 40 गावांमधील रुग्ण या आरोग्य केंद्रात येत असतात आणि सेवा अतिशय सुंदररित्या पुरवली जाते.सुमारे 36 हजारावर लोकसंख्येसाठी हे एकच केंद्र असल्याने येथे कामाचा ताण बराच जास्त असतो. कर्मचाऱ्यांची कतरता तरीही सोय माञ पुरी आहे. या PHC मध्ये आशा सेविका 35 आहेत. कायर P.H.C ह्या केंद्राला भेट दिली असता प्रकर्षाने जाणवले ते डॉक्टर व कर्मचार्‍यांमधील माणूसपण! माणूसकीचा ओलावाच दिसला….! हे विशेष.The humanity of doctors and staff.Cowardly primary health centers are a boon to the poor for “delivery”.

इथे डॉ.रविंद्र देवगडे हसतमुख असलेल्या डॉक्टरांना बघूनच रुग्णाला धीर येत असावा. त्यांच्या देहबोलीत आत्मविश्वास व एका डॉक्टरला आवश्यक असलेली मृदुता ह्यांचा अनोखा संगम दिसतो. शासकीय सेवा ही नेहमीच नकारात्मकरीत्या बघितली जाते. पण डॉ.
“रविंद्र देवगडे “यांचाकडे पाहून समजते की ,ह्यात किती अपरंपार कष्ट असतात आणि ते हसतमुखाने कसे करता येतात. डॉ. रविंद्र देवगडे यांचा नेतृत्वामध्ये आणखीन एक डॉक्टर आहेत त्या म्हणजे डॉ.भक्ती काकडे..! हेही असेच हसतमुख व सतत कार्यरत असलेले डॉक्टर आहेत. दोघांच्याही चेहर्‍यावर ‘आपण कोणाला तरी उपचारांनी बरे केल्याचे’ आत्मिक समाधान सतत त्या दोघाना विलसत असते.

कर्मचार्‍यांमध्ये वरिष्ठ संगीता वानखेडे आहेत.त्यात हेड नर्स सुनीता नांदगावे असून त्यांच्या टीममध्ये देवकण्या बुल्ले, मारोती मसे,विनोद किनाके, सुनिल जांभूळकर, सरला पशेरकर माया पेटकर हे सर्व आहेत. ह्या शिवाय पॅथॉलॉजी, डेटा प्रोसेसिंग हेही विभाग असून तेथे उचित प्रशिक्षण असलेले कर्मचारी आहेत.ताई सुनीता नांदगावे,सरला पशेरकर व देवकण्या बुल्ले टीमशी गप्पा मारताना जाणवले की शहरी विभागात, अद्ययावत सोयी -सुविधांमध्ये राहून स्वतःचा विकास करून घेणारी स्त्री आणि अश्या आडगावात राहून गोरगरीबांची शुश्रुषा करणारी स्त्री ह्यात किती तफावत आहे. कायर गावातील प्राथमिक हे दोन डॉक्टर व या नर्स ताई किती महान कार्य करत आहे ह्याची जाणीवही शहरवासीयांना नसेल.

डॉ.देवगडे व त्यांच्या टीमने रुग्णांसोबत आपुलकीचे नाते निर्माण केलेले आहे. जुनाट अंधश्रद्धांचे निर्मूलन केलेले आहे. अनेकांना जीवदाने दिलेली आहेत तर कित्येकांना जन्म दिलेला आहे. त्यांच्या वागण्याबोलण्यात कोणताही गर्व नाही किंवा कोणतेही शल्य नाही. गीतेतील ‘कर्मण्येवाधिकारस्ते’ ह्या श्लोकानुसार त्या सर्वांचे आचरण असून त्याशिवाय ही नोकरी करताना त्यांनी इतरही अनेक संकटाचा सामना केलेला आहे.

कायर प्राथमिक आरोग्य केंद्र गरिबांना “प्रसूतीसाठी” ठरताहेत वरदान….

” खासगी हॉस्पिटलमध्ये सिझर डिलेव्हरीचं प्रमाण मोठं असताना कायर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे .महिलांना प्रसुतीच्या दरम्यान अनेकदा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. वणी तालुक्याअंतर्गत अनेक खासगी प्रसुतीगृहांची सोय असलेली हॉस्पिटल आहेत. यामध्ये अर्थातच खासगी हॉस्पिटलची संख्या जास्त आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये सिझर डिलेव्हरीचे प्रमाण मोठं असताना कायर येथील हॉस्पिटलमधून “नॉर्मल प्रसुतीची” एक महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे.वणी तालुक्यात 4 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्यात कायर, शिरपूर, कोलगाव व राजूर या आरोग्य केंद्रात महिलांना डिलेव्हरीसाठी देण्यात येणाऱ्या गोळ्या-औषधांचा खर्च सोडला तर सर्व इलाज हा मोफत केला जातो. खासगी हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात बिल येत असल्यानं सामान्य रूग्णांसाठी कायर आरोग्य केंद्र गर्भवती स्त्रियासाठी मोठा आधार ठरला आहे यात माञ काहीच शंका नाहीच.”

गर्भवतींची मोफत तपासणी :-

गर्भवती महिलांना कवडीचाही खर्च येऊ नये यासाठी गर्भावस्थेत करण्यात येणा°या सर्व चाचण्या एचएलएल लॅबद्वारे मोफत करण्यात येतात. थायराईड, सीबीसी, मधुमेह, कावीळ,कोलेस्ट्राल,लिपीट प्रोफाईल, किडनी, हायपरटेंश रक्त व मधुमेह यांची तपासणी येते.

डॉ. रविंद्र देवगडे यांची प्रतिक्रिया….

गर्भवतींना संदर्भ सेवा देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. रुग्णांच्या सेवेसाठी असलेल्या कार्यात आम्ही विशेष लक्ष घालत असल्यामुळे प्रसुतीचे प्रमाण सर्वाधिक आहे व अनेक प्रकारचे रुग्ण सेवा होईल शक्य तेवढं देत असतो.”- डॉ.रविंद्र देवगडे (प्राथमिक आरोग्य केंद्र, कायर)

कर्मचाऱ्यांची कमतरता तरीही सोय माञ पूर्ण..

रिक्त पदे:- आरोग्य सहायिका स्त्री,आरोग्य सहायक पुरुष , औषध निर्माता, आरोग्य सेवक ,आरोग्य सेविका, सफाई कामगार. या केंद्रावर कामाचा ताण अती असतानाही डॉ. देवगडे व डॉ.भक्ती काकडे हे दोघेही या केंद्रात येणाऱ्या रुग्णांना हसतमुख सेवा देण्याचे कार्य अहोरात्र देत असताना दिसुन येत आहे. यांचा कार्याला कायर गावकऱ्यांचा सलाम…!

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments